Kerosene demand decreased in Pune District | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यात रॉकेलची मागणी पाचशे किलोलिटरने घटली

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 मे 2017

गेल्या वर्षी 1 हजार 500 किलोलिटर तर मागील महिन्यात 972 किलोलिटर रॉकेलचा पुरवठा केला गेला. दहा तालुक्‍यांत रॉकेलची मागणी घटल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाचशे किलोलिटरने मागणी घटली आहे. परंतु खेड, आंबेगाव, जुन्नर हा दुर्गम आणि डोंगराळ भाग असल्याने अद्यापही येथे पारंपरिक लाकूडफाटा, रॉकेलवर स्वयंपाक केला जात आहे. त्यामुळे रॉकेलची मागणी जास्त आहे. आगामी काळात या तीनही तालुक्‍यांत एलपीजी जोडणी देण्यावर भर दिला जाईल.
- दिनेश भालेदार, जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी

पुणे - प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गेल्या वर्षभरात एकूण 45 हजार 356 गॅसजोड देण्यात आले. परिणामी, जिल्ह्यात रॉकेलची मागणी पाचशे किलोलिटरने घटल्याची माहिती जिल्हा अन्नधान्य वितरण विभागाकडून देण्यात आली.

केंद्र सरकारकडून देशभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात 3 लाख 55 हजार 142 कुटुंबे दारिद्य्ररेषेखाली राहत आहेत. त्यामुळे या कुटुंबांकडे एलपीजी जोडणी नाही. त्यांना स्वयंपाकासाठी लाकूडफाटा, जळण, गोवऱ्या आणि रॉकेल यांच्यावर अवलंबून राहावे लागते. जिल्हा स्तरावर गावे प्रदूषणविरहित करण्यासाठी एलपीजी वापरासाठी विशेष सुरक्षा कार्यशाळा, रोड शो, पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्या माध्यमातून सुमारे 40 हजार कुटुंबीयांना एलपीजीची नवीन जोडणी देण्यात आली. त्यामुळे रॉकेलची मागणी घटली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख