केंदूरच्या ग्रामस्थांनी केला 'आमदार सूनबाई'चा सन्मान !

मी केंदूरची सून म्हणून विधानसभेत पोचले. -मेघना बोर्डीकर- साकोरे
Meghana sakore bordikar
Meghana sakore bordikar

शिक्रापूर :  परभणी जिल्ह्यातील जिंतूर- सेलू विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या केंदूर (ता. शिरूर) गावच्या सूनबाई मेघना दीपकराव बोर्डीकर- साकोरे यांचा केंदूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते भरत साकोरे व भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब साकोरे यांच्या पुढाकाराने ग्रामदैवत केंद्राई मातेच्या मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

या वेळी पंचायत समितीचे सभापती विश्‍वास कोहकडे, सुभाष उमाप, भगवानराव शेळके, सविता पऱ्हाड, ऍड. दत्तात्रेय थिटे, रामशेठ थिटे, विजय थिटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच वंदना ताठे यांनी आमदार बोर्डीकर- साकोरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मान केला.

या वेळी बोर्डीकर - साकोरे म्हणाल्या, ''पती आयपीएस अधिकारी असल्याने त्यांनी गृहिणी म्हणून मला स्वीकारले. मात्र, माझ्यातील नेतृत्वगुण वडील रामप्रसाद बोर्डीकर व पती दीपकराव साकोरे यांनी ओळखले, त्यामुळे मी केंदूरची सून म्हणून विधानसभेत पोचले. आदर्श पती आणि शिस्तीचा साकोरे परिवार म्हणून मला आमदार म्हणून राज्यात सिद्ध व्हायचे आहे. 

मुलगी दहावीला असताना जाऊबाई डॉ. सुचित्रा साकोरे, मंत्रालयात उपसचिव असलेले दीर राहुल साकोरे, सासू-सासरे आणि सर्व कुटुंबीयांनी निभावलेली जबाबदारी मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यांच्याच बळावर विधानसभेत पोचले.''

''जिंतूर- सेलूमधील 30 हजार मतदार पुणे जिल्ह्यात आहेत. ते मतदानासाठी गावाकडे जाण्यासाठी केंदूरच्या भरत साकोरे, प्रदीप साकोरे, अनिल साकोरे यांच्यासह डॉ. राजेंद्र थिटे व काही केंदूरकरांनी जिंतूर- सेलूमध्ये येऊन केलेल्या योगदानामुळे निवडून आले. केंदूरची सून असल्याने गावाच्या पाण्यासह इतर सर्व प्रश्न मी प्राधान्याने विधानसभेत मांडून प्रश्‍नमुक्त केंदूर करण्याचा प्रयत्न करेन,'' असे त्यांनी सांगितले.


के. के. साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. गोविंद साकोरे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com