कऱ्हाड-चिपळूण रेल्वेसाठी आग्रही, पाठपुरावा करणार : शंभूराज देसाई

45 वर्षानंतर साताऱ्याला संधीसातारा जिल्ह्याचे सुपुत्र यशवंतराव मोहिते यांनी 45 वर्षापूर्वी राज्याच्या अर्थसंकल्प मांडला होता. त्यांच्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 45 वर्षांनी मला राज्याच्या सर्वोच्च सभागृहात अर्थ खात्याचा राज्यमंत्री म्हणून अर्थसंकल्प मांडण्याची संधी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यामुळे मिळाली. माझ्याकडे जबाबदारी होती त्याचे पालन करुन मी अर्थसंकल्प मांडला आहे.
कऱ्हाड-चिपळूण रेल्वेसाठी आग्रही, पाठपुरावा करणार : शंभूराज देसाई

कऱ्हाड : कऱ्हाड-चिपळूण रेल्वे मार्गासाठी सुरेश प्रभु केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांच्याकडे सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला होता. त्याच्या सर्व्हेचेही काम सुरु झाले होते. मात्र त्यानंतर काहीच कार्यवाही झाली नाही. त्याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विनंती करुन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे त्या मार्गासाठी पाठपुरावा करु, असे आश्वासन गृह व वित्त राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

अर्थसंकल्पातील तरतुदी आणि विकास कामांची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मी अर्थराज्यमंत्री म्हणुन राज्याच्या विकासाचा समतोल राखण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला असल्याचे सांगून मंत्री देसाई म्हणाले, कऱ्हाड-चिपळुण रेल्वेमार्ग व्हावा या बाजुने मी आहे. मध्यंतरी सुरेश प्रभु केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांच्याकडे सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर त्याच्या सर्व्हेचेही काम सुरु झाले होते. मात्र त्यानंतर हे काम का रखडले आहे याची माहिती घेतली जाईल. 

अधिवेशनानंतर इंडस्ट्रीयल कॉरीडॉरची कार्यवाही 
सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योग यावे आणि तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री बाळासाहेब पाटील व आम्ही सर्वच लोकप्रतिनीधी प्रयत्नशील आहोत. विधानसभा अधिवेषण झाल्यानंतर कॉरीडॉर कोठे असावा, त्यासाठी कोणती जागा निश्‍चीत करावी, त्यासाठी नैसर्गिक उपलब्धता काय हवी आहे, यासाठीची सर्व कार्यवाही सुरु होईल.अशी 


बोटींगवरील श्रेयवाद नाही 
कोयना धरण आणि बॅकवॉटरचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र घोषित झाले आहे. त्यामुळे पर्यटनासाठी असलेला नौकविहार बंद आहे. तो सुरु व्हावा यासाठी मी अनेक वर्षे प्रयत्न करत आहेत. दोन वर्षापूर्वी तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांसोबत हवाई पाहणीही झालेली आहे. नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतही त्यासंदर्भात बैठक झाली आहे. त्यामुळे ज्यांना श्रेय घ्यायचे आहे त्यांना घेवू द्या माझे प्राधान्य मात्र धरणाची सुरक्षितता आणि नौकाविहाराला आहे, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी आज येथे दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com