Keep a watch on ration shopkeepers; Take action on those who sell grain with extra money: Imtiaz Jalil | Sarkarnama

रेशन दुकानदारांवर वॉच ठेवा; जास्त पैसे घेऊन धान्य विकणाऱ्यांवर कारवाई करा: इम्तियाज जलील

जगदीश पानसरे
गुरुवार, 26 मार्च 2020

 मुबलक साठा उपलब्ध करून देतानाच ते जास्त किमतीने विकला जाऊ नये यावर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेवावे असेही इमतियाज जलील यांनी  बजावले.

औरंगाबाद : स्वस्त धान्य दुकान मालकांवर वॉच ठेवत जो कोणी या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शासकीय दरा पेक्षा जास्त पैसे घेऊन धान्य विकत असेल त्यावर कठोर कारवाई करावी अशी सूचना एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना दिली आहे.

इम्तियाज जलील यांनी नुकतीच अन्नधान्य पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आपल्या कार्यालयात घेतली . यावेळी लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य, मजूर व रोज काम करून पोट भरणाऱ्या लोकांना तसेच रेशन कार्डधारकांना सर्व प्रकारचे धान्य उपलब्ध करून द्यावे. कुठल्याही प्रकारची कमतरता भासू नये अशा सूचना करतानाच अचानकपणे रेशन दुकानांवर धडक देऊन येथील व्यवहारांची पाहणी व तपासणी करावी असेही इमतियाज जलील म्हणाले.

 कोरोनाचे मोठे संकट देशासमोर उभे असताना या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्यांची लुबाडणूक केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. औषधी व मास्क विक्रीचा काळाबाजार पाहता स्वस्त धान्यांच्या दुकानावरील धान्य लाभार्थ्यांना ठरवून दिलेल्या किमतीतच मिळते की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख