’ दारूची बाटली’ लॉकमध्ये ठेवा, मद्यप्रेमींना निर्देश 

...म्हणून टाळेबंदीकाही लोकांना मानसिक तणाव आणि थकवा जाणवतो अशांनी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी, संसर्ग थांबावा म्हणूनच सरकारने लॉकडाउनचा मार्ग निवडला आहे. या माध्यमातून तुम्ही स्वत:चे आणि इतरांचे देखील संरक्षण करणे अपेक्षित आहे.
’ दारूची बाटली’ लॉकमध्ये ठेवा, मद्यप्रेमींना निर्देश 

नवी दिल्ली : लॉकडाउनच्या काळात घरात बसून कंटाळा आल्याने एकच प्याला तोंडी लावण्याच्या विचारात असाल तर आताच थांबा, कारण तंबाखू सेवन आणि मद्यपान केल्याने रोगप्रतिकार शक्ती कमी होते, त्यामुळे बाहेरचा विषाणू तुमच्यावर थेट वार करू शकतो असा इशारा आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. 

एखाद्याला कोरोनोचा संसर्ग झाल्याचे तुमच्या निदर्शनास आले असेल तर त्याला खबरदारी घ्यायला सांगा. तसेच वैद्यकीय मदत कशी मिळवता येईल याचेही त्याला मार्गदर्शन करा असे आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. कोरोनाच्या संसर्ग काळामध्ये मानसिक संतुलन ढळू देऊ नका असेही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. 

मंत्रालय म्हणते... 
गरज असेल तर घराबाहेर पडा 
घराजवळच्या दवाखान्यांची माहिती घ्या 
संसर्ग झालेल्यांनी घाबरून जाऊ नये 
संगीत ऐका, वाचन करा, 
मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहा 
वृद्धांना जीवनावश्‍यक वस्तूंसाठी मदत करा 
अफवा पसरवू नका, त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com