शिवसेनेच्या विश्वविक्रमी कावड यात्रेची जय्यत तयारी....

 शिवसेनेच्या विश्वविक्रमी कावड यात्रेची जय्यत तयारी....

औरंगाबाद : शिवसेना-भाजप महायुतीचे अंबादास दानवे नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झाले. या विजयाने शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. तीन वर्षापासून अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून भव्य कावड यात्रा काढण्यात येते. येत्या 27 ऑगस्टला सकाळी साडेसात वाजता ही कावड यात्रा निघणार आहे. अंबादास दानवे आमदार झाल्यानंतरची ही पहिलीच कावड यात्रा असल्यामुळे शिवसैनिक जोरदार तयारीला लागल्याचे चित्र आहे. 


श्रावण मासानिमित्त शिवसेनेकडून कावड यात्रा काढली जाते. गेल्या वर्षी 501 फुटांची कावड घेऊन ही यात्रा काढण्यात आल्यामुळे याची नोंद वर्ल्ड ग्रुप ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती. यंदा देखील विश्वविक्रमी नामांकन प्राप्त कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (ता. 27) हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदीराजवळील पवित्र कुंडातून जल कलश भरून खडकेश्वर महादेवाला पर्जन्यवृष्टीसाठी जलाभिषेक करण्यात येणार आहे. 

हरसिद्धि माता मंदिरापासून या कावड यात्रेचा प्रारंभ होऊन टीव्ही सेंटर- गणेश कॉलनी- चेलीपुरा- गांधी पुतळा- सराफा- सिटी चौक -मछली खडक- गुलमंडी - संभाजी पेठ- नागेश्वरवाडी येथून खडकेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी कावड यात्रा पोहचेल. कावड यात्रेत समस्त हिंदू बांधव शिवभक्त यांनी विराट संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, सहसंयोजक दयाराम बसैये यांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com