जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर, पाच जिल्ह्यांत संचारबंदी शिथिल

जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर, पाच जिल्ह्यांत संचारबंदी शिथिल

श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमधील पाच जिल्ह्यांतील प्रतिबंधात्मक आदेश केंद्राने आज उठविल्यानंतर येथील जनजीवन पूर्ववत झाले असून, डोडा आणि किश्‍तवाड या जिल्ह्यांतील संचारबंदीही मागे घेण्यात आली आहे. जम्मूतील पाचही जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली असून, सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थितीही वाढली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

जम्मू, कथुआ, सांबा, उधमपूर आणि रियासी या पाचही जिल्ह्यांतील सर्व प्रकारचे प्रतिबंधात्मक आदेश मागे घेण्यात आले आहेत. काश्‍मीर खोरे हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले असून, पाच ऑगस्टपासून येथे एकही अनुचित घटना घडली नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या भागातील शुक्रवारची प्रार्थना शांततेत पार पडल्यानंतर आज व्यापार संकुले आणि दुकाने सुरू झाली होती. पूँछ, राजौरी आणि रामबन या जिल्ह्यांतील संचारबंदी मात्र कायम आहे. 

दिल्ली-लाहोर बससेवा रद्द 
पाकिस्तानने सोमवारपासून दिल्ली ते लाहोर ही मैत्री बससेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. उभय देशांमध्ये 1999 मध्ये ही बससेवा सुरू झाली होती; पण 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर ती स्थगित करण्यात आली होती. पुन्हा 2003 मध्ये ती सुरू झाली होती. पाकिस्तानचे संवाद आणि पोस्ट सेवा खात्याचे मंत्री मुराद सईद यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली. दरम्यान, ही बससेवा रद्द करण्यात आल्यानंतरही आज सकाळीच दोन प्रवासी या बसच्या माध्यमातून लाहोरला रवाना झाले, तर 165 प्रवाशांना घेऊन थार एक्‍स्प्रेस आज कराचीला गेली. पाकिस्तानने शुक्रवारीही रेल्वेसेवाही रोखण्याचा निर्णय घेतला होता. 

नंदनवनातून... 
अजित दोवाल अनंतनागमध्ये तरुणांच्या भेटीला 
श्रीनगरमधील आंदोलनाचे वृत्त खोटे : परराष्ट्र मंत्रालय 
श्रीनगरमध्ये लोकांची "एटीएम'बाहेर एकच गर्दी 
काश्‍मीरमधील इंग्रजी वर्तमानपत्रे आज प्रसिद्ध 
दहशतवादी हल्ल्याच्या शक्‍यतेने सुरक्षा दले सावध 
स्वातंत्र्यदिनी अनेक भागांत ध्वजवंदन होणार 

पाकिस्तानकडून चिथावणीखोर वक्तव्ये... 
येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये जम्मू- काश्‍मीरमधील परिस्थिती निवळेल, सध्या पाकिस्तानातील नेतेमंडळी चिथावणीखोर आणि बेजबाबदार विधाने करत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सरकारने योग्य पावले उचलली आहेत असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com