कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराला अटींवर संमती

दोन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तारास पक्षश्रेष्ठींची संमती मिळवली आहे. त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी (ता. 20) होणार आहे. पण, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पांना काही अटी घातल्याचे समजते.
कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराला अटींवर संमती

बंगळूर  : दोन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्तारास पक्षश्रेष्ठींची संमती मिळवली आहे. त्यानुसार मंत्रिमंडळ विस्तार मंगळवारी (ता. 20) होणार आहे. पण, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पांना काही अटी घातल्याचे समजते. त्यामुळे, मंत्रिमंडळाची यादी अंतिम न करताच ते बंगळूरला परतले आहेत. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात भाजपच्या 13 व एका अपक्ष आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्‍यता आहे.

येडियुराप्पा यांनी 26 जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु, पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळ विस्ताराला परवानगी देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला. केंद्रीय नेत्यांनी आधीच कर्नाटक सरकारचा ताबा घेतल्याने येडियुराप्पा यांच्या जवळच्या आमदारांना धक्का बसण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी सकाळी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. दुपारी मंत्रिमंडळ विस्तार होईल.

पहिल्या टप्प्यात 14 आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. संभाव्य मंत्र्यांची यादी सोमवारी पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात येणार आहे.
 
येडियुराप्पांनी अध्यक्ष शहा यांच्या भेटीवेळी आमदारांची यादी घेतली होती. परंतु, आम्ही तुमची यादी अंतिम करणार नाही. मंत्रिमंडळात कुणाला स्थान द्यायचे याचा निर्णय आम्हीच घेणार आहोत. आम्ही निश्‍चित केलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे. अन्यथा निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार व्हावे. हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीबरोबर कर्नाटकातही निवडणूक घेता येतील, असे अध्यक्ष शहा यांनी येडियुरप्पा यांना सुनावले. त्यामुळे, सरकार टिकवून ठेवण्यासाठी येडियुराप्पा यांनी या अटीला मान्यता दिल्याचे समजते. 

नव्यांना संधी शक्‍य
भाजपमध्ये 105 आमदार आहेत. बहुतेक आमदार ज्येष्ठ आहेत. पण, सर्व ज्येष्ठ आमदारांना यावेळी मंत्रीपद मिळणार नाही. पक्ष संघटना आणि भविष्यकाळाचा विचार करून काही नवीन आमदारांना मंत्रीपद देण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करीत आहेत. त्यामुळे, काही आश्‍चर्यकारक नावे पुढे येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com