कर्नाटकात "हनीट्रॅप'मध्ये  बेळगावातील आमदार ?

कर्नाटकात "हनीट्रॅप'मध्ये  बेळगावातील आमदार ?

बंगळूर : राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या बंगळुरातील हनीट्रॅप प्रकरणात भाजपच्या एका आमदारासह एकूण दहा आमदार अडकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात आपले नाव येऊ नये, यासाठी अनेक आमदारांनी दबाव तंत्राचा वापर करत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हनीट्रॅपमध्ये अडकलेल्यांमध्ये बेळगाव जिल्ह्यातील एका आमदाराचाही समावेश असल्याची चर्चा आहे. 

प्रकरणातील मुख्य संशयित सूत्रधार राघवेंद्र याची चौकशी करून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. यानंतरही एकामागोमाग एक आमदारांची प्रकरणे बाहेर येऊ लागली आहेत. अनेक लोकप्रतिनिधी जाळ्यात अडकल्याने हनीट्रॅप प्रकरणाची अधिक चौकशी होणे आवश्‍यक आहे. मात्र लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पोलिसांनीही यामधून अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

संशयित राघवेंद्रची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी मिळविली होती; पण केवळ एकच दिवस चौकशी करून पोलिसांनी न्यायालयासमोर राघवेंद्रला हजर केल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित करण्यात आले व राघवेंद्रची चौकशीच होऊ नये, अशी काळजी घेतली जात आहे. 

या प्रकरणातील सर्व व्हिडिओ, ऑडिओ आणि छायाचित्रे राज्य सरकार आपल्याकडे घेऊ पाहात आहे; पण यातील काही ऑडिओ आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे पोलिसांना सध्या त्याची डोकेदुखी ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com