karnatak cm | Sarkarnama

सिद्धरामय्यांच्या हेलिकॉप्टरला पक्ष्याची धडक

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

बंगळूर : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला पक्षी अचानक धडकल्याने एचएएल विमानतळावर तातडीने उतरावे लागले. हा प्रकार आज घडला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांच्यासह चार जण हेलिकॉप्टरमध्ये होते आणि सर्व जण सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पक्षीच्या धडक्‍याने हेलिकॉप्टरचे कोणतेही नुकसान झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच पक्ष्याची धडक झाली. त्यामुळे तातडीने हेलिकॉप्टरचे लॅंडिंग झाले. कालांतराने हेलिकॉप्टरला उडण्याची परवानगी मिळाल्यानंतर नियोजित कार्यक्रमासाठी हसन जिल्ह्यातील श्रवणबेळगोळसाठी मुख्यमंत्री आणि अन्य सहकारी रवाना झाले. सिद्धारामय्या हे महामस्तकाभिषेक विकास योजनांसाठी श्रवणबेळगोळला गेले होते. बारा वर्षांतून एकदा होणारा महामस्तकाभिषेक कार्यक्रम पुढच्या वर्षी फेब्रुवारीत होणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख