करमाळ्याचे शिवसेना आमदार नारायण पाटील यांच्या विरोधात फिल्डिंग ?  

करमाळ्यातून आमदार पाटील यांच्याविरोधात कान भरण्यासाठी विरोधकांनी प्रा.सावंत यांच्याजवळ खास माणसं सोडली असल्याचेही सांगितले जात आहे.
Karmala-politics
Karmala-politics

करमाळा : सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेकडे एकमेव  असलेल्या  करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांची गेल्या पाच वर्षांतील कारकिर्द पाहता त्यांची ताकद वाढली आहे.अशा परिस्थितीत विरोधकांनी माञ थेट त्यांच्या उमेदवारीलाच नख लावण्याचे कारस्थान केल्याची जोरदार चर्चा आहे. प्रा.तानाजी सावंत नारायण पाटील यांना कितपत साथ देतात हे महत्वाचे ठरणार आहे . 

दरम्यान, जातीच्या समीकरणात आमदार पाटील हे शिवसेनेतील धनगर समाजाचे एकमेक आमदार आहेत. उमेदवारीवरुन  काही बेबनाव झालाच तर त्यांचे पडसाद राज्यभर उमटू शकतात हे ही नाकारून चालणार नाही. 

राज्यात सध्याचे भाजप-सेनेत होणारे प्रवेश लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयाची खाञी वाटत नसल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांतिक सदस्या रश्मी बागल यांच्या पक्ष बदलाच्या चर्चेला दिवसेंदिवस रंग चढू लागला आहे. 

विधानसभेला निवडणुकीत पाठिंबा मिळेल या आशेने लोकसभा निवडणुकीत बागल गटाने संजय शिंदे यांचा प्रचार केला. यावेळी बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी मामा खासदार व दिदी आमदारचा नारा दिला खरा, पण संजयमामांचा पराभव झाल्याने या घोषणेवर पाणी पडले आहे. श्री. शिंदे यांनी करमाळा विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. 

जर राष्ट्रवादीचे नेते संजय शिंदेना लोकसभेला उभे करू शकतात.मग आता विधानसभेला संजय शिंदे यांना  रश्मी बागल यांचा प्रचार करायला का करायला लावू शकत नाही?  जर आता संजय शिंदे राष्ट्रवादीचे ऐकत नसतील तर मग आता राष्ट्रवादीत कशाला थांबायचे ? असा सूर बागल गटात उमटत आहे. त्यामुळे आता शिवसेनेत जाण्यासाठी बागल गटाने हालचाली सुरू केल्याची सध्यातरी दबक्या आवाजात चर्चा आहे. 

करमाळ्यात सत्कार समारंभात जलसंधारणमंञी प्रा.तानाजी सावंत यांनी शिवसेना आमदार पाटील यांना अकलूजचे उबरे न झिवण्याचा सल्ला दिल्याने बागल किंवा संजय शिंदे शिवसेनेत जाऊन उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेली चर्चा अधिकच वाढली आहे . करमाळ्यातून आमदार पाटील यांच्याविरोधात कान भरण्यासाठी विरोधकांनी प्रा.सावंत यांच्याजवळ खास माणसं सोडली असल्याचेही सांगितले जात आहे. 

आमदार पाटील हे विकास कामांच्या बळावर शड्डू ठाकण्यास सिध्द झाले आहेत. त्यांनी सर्व निवडणुका शिवसेनेच्या बाण चिन्हावर लढवल्या आहेत. करमाळा पंचायत समितीवर पहिल्यांदाच त्यांनी भगवा पडकवला. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील पाचपैंकी चार सदस्य करमाळ्याचे आहेत. यावेळी त्यांनी मोहिते पाटील, जयवंतराव जगताप यांची मदत घेतली असली तरी चिन्हावरच निवडणूक लढवली. अशा परिस्थितीत आमदार पाटील यांना कुठल्या मुद्दावर डावलणार हाही प्रश्न महत्त्वाचा आहे.

एका बाजूला बागल हातातले घड्याळ काढून धनुष्यबाण उचलण्याची तयारी करत आहेत. तर दुसरीकडे संजयमामा यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी ते राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, वंचीत आघाडीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचे ऐकिवात आहे. विधानसभेला बागल व शिंदे कोण कुठल्या पक्षाकडून लढणार या विषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com