मराठा आरक्षण : विशेष अधिवेशनासाठी साताऱ्यातील सर्वपक्षिय आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार 

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसंदर्भात राज्याच्या विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षिय आमदार लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
मराठा आरक्षण : विशेष अधिवेशनासाठी साताऱ्यातील सर्वपक्षिय आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार 

कऱ्हाड : मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसंदर्भात राज्याच्या विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षिय आमदार लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. 

कऱ्हाड तालुका मराठा समन्वय समितीच्या सदस्यांनी साताऱ्यात जिल्ह्यातील सर्व पक्षिय आमदारांची भेट घेतली, त्यावेळी मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार एकत्रिपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

कऱ्हाड तालुका मराठा समन्वय समितीच्या सदस्यांनी सातारा येथे जिल्ह्यातील आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींची भेट घेतली. त्यावेळी आमदार शिंदे यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांची मुख्यमंत्र्यांशी भेट व्हावी यासाठी पुढाकार घेवू असे सांगितले. 

मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य शासन गंभीर नाही नसल्याची भावना राज्यातील मराठा समाजामध्ये आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी शासनाने विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मराठा समन्वय समितीची मागणी असल्याचे सदस्यांनी सांगितले. 

आंदोलनावेळी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणेची अजूनही ठोस कार्यवाही झाली नाही. अशी मराठा बांधवांनी समाजाच्या भावना असल्याचे सांगितले. 

यावेळी आमदारांसह जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील माने, संचालक राजेश पाटील-वाठारकर उपस्थित होते. त्यावेळी लवकरच मुख्यमंत्र्यांची वेळ घेवून समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांपुढे जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार ठामपणे भूमिका मांडतील अशी ग्वाही आमदार शिंदे यांनी यावेळी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com