कर्डिले, शिंदे, कोल्हेंनी वठविली विरोधी पक्षाची भूमिका !

कर्डिले, शिंदे, कोल्हेंनी वठविली विरोधी पक्षाची भूमिका !

नगर : महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजपच्या वतीनेे जिल्हाभर आंदोलने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच प्रत्येक तालुक्यातील तहसील, प्रांत कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले, प्रा. राम शिंदे, स्नेहलता कोल्हे यांनी आक्रमक भाषणे केली.

युती सरकारच्या लोकाभिमुख, अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत योजना करणाऱ्या योजना या महाबिघाडी सरकारने गुंडाळून ठेवल्या, असा आरोप माजी आमदार कोल्हे यांनी केला.

राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले असून, सरकार केवळ गप्पा मारत आहे. शेतकऱ्यांचीही घोर फसवणूक झाली, असल्याची टीका माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केली.

महाविकास आघाडीने लोकांचा भ्रमनिरास केला असून, विकासकामांना स्थगिती देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे हे स्थगिती सरकार आहे, अशी टीका माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केली.

ठाकरे यांच्याकडून निराशा
"भाजपचा विश्वासघात करून राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसबरोबर सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेची घोर निराशा करत शेतकऱ्यांचाही विश्वासघात केला आहे. येत्या काळात जर कारभार सुधारला नाही, तर भारतीय जनता पक्ष तीव्र आंदोलन करील,'' असा इशारा भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी आज दिला.

शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, असे आरोप करत त्याच्या निषेधासाठी भाजपतर्फे आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com