karad politics | Sarkarnama

उंडाळकरांच्या उपकाराची राष्ट्रवादीकडून परतफेड 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 20 एप्रिल 2017

सातारा : माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकरांशी हात मिळवणी करून राष्ट्रवादीने कऱ्हाड पंचायत समितीची सत्ता मिळविली. पण कऱ्हाडात उंडाळकरांनी केलले सहकार्य लक्षात घेऊन त्यांचे पुत्र ऍड. उदयसिंह पाटील यांना जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीवर घेण्यात आले. आगामी काळात लोकसभेसह विधानसभेत कऱ्हाड दक्षिण, उत्तरमध्ये राष्ट्रवादीला राजकारण सोपे होण्यासाठी ही रणनीती खेळल्याची चर्चा आहे. 

कऱ्हाड पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सात जागा मिळाल्या तर माजी आमदार विलासराव उंडाळकरांच्या कऱ्हाड विकास आघाडीला सात जागा
मिळाल्या होत्या. तर भारतीय जनता पक्षाला सहा आणि कॉंग्रेसला चार जागा मिळाल्या होत्या. सत्ता स्थापनेसाठी प्रत्येकाला कोणाच्या तरी मदतीची गरज होती.
त्यानुसार वेगवेगळ्या शक्‍यता पुढे आल्या. यामध्ये उंडाळकर व अतुल भोसले एकत्र येऊन सत्ता स्थापन होईल, अशी चर्चा होती. पण मागील काही घटना घडामोडी
पाहता ते शक्‍य नव्हते. शेवटी राष्ट्रवादीने उंडाळकरांशी हात मिळवणी करत 14 जागांच्या माध्यमातून कऱ्हाड पंचायत समितीत सत्ता स्थापन केली.

जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीत राष्ट्रवादीची गणिते जुळली होती. पण कऱ्हाडात जुळणार का, याची उत्सुकता होतील. पण उंडाळकरांच्या मदतीने तेही शक्‍य झाले. आता आगामी काळात कऱ्हाड पंचायत समितीतील सत्तेला धक्का लागू नये व उंडाळकरांनी केलेल्या उपकाराची परतफेड राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. उंडाळकरांचे पुत्र ऍड. उदयसिंह पाटील यांना जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीवर घेतले आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख