karad politics | Sarkarnama

पाटील- उंडाळकर युतीत आमदारकीची गणिते 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 15 मार्च 2017

कऱ्हाड पंचायत समितीत आमदार बाळासाहेब पाटील यांनी माजी आमदार विलासराव उंडाळकरांशी हात मिळवणी करत राष्ट्रवादीचा सभापती केला. भाजप,
कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली असून या राजकीय आघाडीतून 2019 ची विधानसभेची गणिते जुळविण्याचा प्रयत्न दोन दिग्गज नेत्यांनी
केला आहे. 

सातारा : कऱ्हाड पंचायत समितीत आमदार बाळासाहेब पाटील यांनी माजी आमदार विलासराव उंडाळकरांशी हात मिळवणी करत राष्ट्रवादीचा सभापती केला. भाजप, कॉंग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली असून या राजकीय आघाडीतून 2019 ची विधानसभेची गणिते जुळविण्याचा प्रयत्न दोन दिग्गज नेत्यांनी
केला आहे. 

कऱ्हाड पंचायत समितीत मतदारांनी कोणालाही स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे समिती कोणाच्या ताब्यात राहणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. गेल्यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी उंडाळकर गटाला बरोबर घेऊन सत्ता मिळविली होती. मागील फॉर्म्युला कायम ठेवत यावेळीही उंडाळकर गटाशी आघाडी करुन पंचायत समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच सभापती करून दाखवला. सलग दुसऱ्यांदा सभापतिपद मिळवून राष्ट्रवादीत आपली कॉलर "ताठ" ठेवली आहे.

दरम्यान उंडाळकर गटाने भविष्यातील राजकीय समीकरणे विचारात घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवत आमदार श्री. पाटील यांच्याबरोबर आघाडी केली आहे. भविष्यात श्री. उंडाळकर यांचे पुत्र व नूतन जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील हे विधानसभेची निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्याचबरोबर भाजपचे सरचिटणीस अतुल भोसले हेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. भाजपशी हातमिळवणी उंडाळकर गटाचा फायदा नव्हता. याचा विचार करून आमदार पाटील यांच्या गटाशी जवळीक साधत उंडाळकर गटाने उपसभापतिपद पदरात पाडून घेतले.

कऱ्हाड उत्तरमध्ये उंडाळकर यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीआधी रान तापवून तयारी केली होती. पूर्वीपासून त्यांना मानणारा गटही उत्तरमध्ये आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या गटाचाही आमदार श्री. पाटील यांना पाठिंबा राहणार हे निश्‍चित आहे. प्रत्येक निवडणुकीत संदर्भ वेगळे असतात. त्याप्रमाणे सध्या पंचायत समितीत भविष्यातील राजकीय गणिते विचारात घेऊन झालेली आघाडीचा पुढे
दोन्ही पाटलांना फायदेशीर ठरणार का, याचीच उत्सुकता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख