मतदार संपर्कात कपिल पाटील 'लय भारी'; म्हणूनच तिसऱ्यांदा आमदारकीची वारी 

आमदार कपिल पाटील यांनी आपल्या उत्तम जनसंपर्काच्या जोरावर तिसऱ्यांदा बाजी मारली आहे . शिक्षकांची कामे ते आवर्जून करतात . शिक्षकांच्या प्रश्नांबाबत ते विधिमंडळात आवाज उठवतात . मात्र असे असले तरी ते आपल्या मतदारांच्या संपर्कात सातत्याने राहातात . त्यांच्या सुखदुःखाला आवर्जून हजर राहतात . त्यामुळेच भाजप आणि इतर पक्षांनी सर्व ताकत पणाला लावूनही कपिल पाटील यांचा गड अभेद्य राहिला आहे .
Kapil_Patil_MLC
Kapil_Patil_MLC

मुंबई :  नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेतील मुंबई शिक्षक
मतदारसंघातून लोकभारतीचे कपिल पाटील तिस-यांदा निवडून आले. पाटील यांच्यासमोर शिवसेना आणि भाजपने मोठे आव्हान उभे केले होते तरी देखिल कपिल यांनी गड कायम राखल्यावरून त्यांचा मतदारसंपर्क 'लय भारी' असल्याचे पुन्हा सिद्ध झाले.

पत्रकारीतेच्या क्षेत्रातील कपिल पाटील यांनी राजकारणात प्रवेश केल्यावर शिक्षकांसाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. यासाठी त्यांनी लोकभारती पक्षाच्या माध्यमातून शिक्षकांचे संघटन करत मुंबई शिक्षक मतदारसंघाची योग्य बांधणी केली. मतदारसंघ कोणताही असो निवडून आल्यावर
मतदारांकडे पाठ फिरवणारे लोकप्रतिनिधी कमी नाहीत. मात्र कपिल पाटील याला अपवाद ठरले. 

पहिल्या टर्ममध्ये निवडून आल्यावर त्यांनी शिक्षकांचे प्रश्‍न विधानपरिषद आक्रमकपणे मांडले. तसेच आमदारकीच्या सहा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मतदारांशी कायम संपर्क ठेवला. मतदारांच्या सुख-दुःखात त्यांनी व्यक्‍तिशः भाग घेतला. एखाद्या शिक्षक मतदाराचा वाढदिवस असेल किंवा अन्य सुख-दुखाचे प्रसंग असतील तर पाटील त्यांच्या घरापर्यंत  पोहोचायचे. 

कुणाच्या घरात काही कार्यक्रम नसला तरी मुंबई आणि उपनगरात काही काही निमित्त गेल्यास तेथे एखाद्या शिक्षकाचे घर असेल तर मुद्याम विचारपूस करण्यासाठी पाटील  थेट घरात हजर व्हायचे. यामुळे आपल्या कुटुंबातीलच सदस्य असल्याची भावना मतदाराच्या कुटुबियांना असायची. 

एक अनुभव सांगताना  कपिल पाटील म्हणाले की, एका
शिक्षकाची पत्नी टाटा हॉस्पिटलमध्ये आजारी होती. काही दिवसांचीच सोबती असल्याने तिला आपणांस भेटायची तीव्र इच्छा झाल्याचे शिक्षकाने सांगताच कपिल पाटील थेट रूग्णालयात पोहोचले. त्यांना भेटून शिक्षक पत्नी भावनिक
झाली. मात्र त्यांच्या  चेह-यावर आनंद दाटून आला. माझी भेट झाल्यावर अवघ्या दोनच दिवसात त्यांनी  प्राण सोडल्याचे सांगताना कपिल पाटील यांचाही आवाज जड झाला. अशा शेकडो आठवणी असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

यावरून निवडणूक झाली तरी मतदारांच्या संपर्कात कायम राहणारे कपिल पाटील तिस-यांदा विधानपरिषदेवर निवडून आले ते फक्‍त आणि फक्‍त संपर्काच्या जोरावरच अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com