बहुजन समाज टिकवण्यासाठी छगन भुजबळांना पाठबळ द्यावेच लागेल - कपिल पाटील

बहुजन समाज टिकवण्यासाठी छगन भुजबळांना पाठबळ द्यावेच लागेल - कपिल पाटील

नाशिक : छगन भुजबळ समतेसाठी काम करीत आहेत. जे ज्यांना ज्यांना खुपले त्यांनी त्यांच्या विरोधात षडयंत्र केले. त्यामुळेच त्यांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे हे कारस्थान ओळखावे. आपल्याला बहुजन समाज टिकवायचा असेल तर छगन भुजबळ यांना पाठिंबा द्यावाच लागेल असे प्रतिपादन मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील यांनी केले. 

नाशिक जिल्हा शिक्षक भारती संघटना आणि लोक तांत्रिक दल यांच्यावतीने आमदार पाटील यांचा सत्कार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले, मंत्रालयात पत्रकार म्हणून काम करत असतांना चळवळीतून पुढे येत आमदार झालो. त्यावेळी पहिल्यांदा छगन भुजबळ यांनी माझा पहिला सत्कार केला. आज पुन्हा त्यांच्या हस्ते सत्कार होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. विशेष म्हणजे छगन भुजबळ यांनी मला राजकारणात ताकद देण्याचे काम केले. 

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर छगन भुजबळ काम करत असून देशभर समतेच्या विचारांसाठी ते काम करत आहे. हे ज्यांना खुपले त्यांच्यामुळे छगन भुजबळ यांना त्रास सहन करावा लागला. सध्याच्या सरकारकडून शिक्षण क्षेत्रातील ज्या थोर लोकांनी चळवळ उभी केली ती चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव असून तो यशस्वी होत असून राज्यातील शाळा बंद पडत आहे. राज्यातील तीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षणा पासून वंचित आहे. शिक्षणाचे खाजगीकरण व्यापारीकरण हे शिक्षण व्यवस्थेसाठी धोका असल्याचे पाटील म्हणाले. 

यावेळी आमदार दिपीका चव्हाण, आमदार जे.पी. गावित, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, प्राथमिक शिक्षक विभागाचे अध्यक्ष नवनाथ केंड, "मविप्र' संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, व्ही. एन. नाईक संस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, डॉ. कैलास कमोद, प्रसाद हिरे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार, जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार, डॉ.भारती पवार आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com