विधानसभा २०१९ : युतीची कळ कोकणातून फिरणार

शिवसेना-भाजप युतीचे निश्‍चित झाले, असे सांगितले जात असले तरी युतीची कळ या वेळी कोकणातून फिरणार, असे वातावरण तयार झाले आहे. राणेंच्या भाजपप्रवेशाची घोषणा स्वतः नारायण राणे यांनी केली. पाठोपाठ 'नाणार रिफायनरी'चा फेरविचार करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले. भाजपकडून शिवसेनेच्या जखमेवर हे मीठ चोळण्यासारखे होते.
Narayan Rane and Bhaskar Jadhav
Narayan Rane and Bhaskar Jadhav

शिवसेना-भाजप युतीचे निश्‍चित झाले, असे सांगितले जात असले तरी युतीची कळ या वेळी कोकणातून फिरणार, असे वातावरण तयार झाले आहे. राणेंच्या भाजपप्रवेशाची घोषणा स्वतः नारायण राणे यांनी केली. पाठोपाठ 'नाणार रिफायनरी'चा फेरविचार करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले. भाजपकडून शिवसेनेच्या जखमेवर हे मीठ चोळण्यासारखे होते.

रायगडपासून सिंधुदुर्गपर्यंत विधानसभेच्या 15 जागा आहेत. कोकणातला शिवसेनेचा पट्टा रायगड-सिंधुदुर्गच. त्यात महाडही येऊ शकते. आजच्या घडीला युतीवर शिवसेनेचे यश अवलंबून आहे. रायगडातील सातपैकी श्रीवर्धन, पेण व अलिबाग हे मतदारसंघ आघाडीकडे राहू शकतात; तर महाड, उरण आणि पनवेल युतीकडे असे ढोबळमानाने म्हणता येईल. कर्जत दोलायमानच राहणार. युती मोडली तर शिवसेनेचे कर्जत आणि उरण येथील उमेदवार अडचणीत येऊ शकतात. लोकसभा निवडणुकीवेळी दृश्‍यस्वरूपात नसलेल्या मोदी लाटेने युतीला तारले; मात्र रायगडात तटकरे विजयी झाले. या वेळी देशभक्तिपर प्रचारावर आघाडी कशी मात करील, यावरही रायगडातील गणिते बदलू शकतात.

रत्नागिरीत शिवसेनेचे वर्चस्व आहे. भास्कर जाधव यांनी शिवसेनेत उडी घेतल्याने शिवसेनेचे बळ वाढले. आघाडीची ताकद चिपळूण वगळता इतरत्र नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम दापोलीतून निवडून आले असले, तरी त्यांची मदार फाटाफुटीवर राहिली आहे. या वेळी भाजपला पाचपैकी दोन मतदारसंघ हवेत. हे होणे कठीणच दिसते. युतीचा निर्णय राज्यस्तरावर झाला, तर स्थानिक भाजप नेत्यांना गप्प बसावे लागेल. रत्नागिरी, राजापूर, गुहागर या मतदारसंघांत शिवसेनेला चिंता नाही. दापोलीत पक्षांतर्गत दुफळी त्रासदायक आहे. चिपळूणमध्ये राष्ट्रवादी तुल्यबळ आहे. युती झाली तर ते अधिक सोपे ठरू शकते; मात्र युती मोडली तर शिवसेनेला अपशकून करण्याएवढी संख्यात्मक ताकद भाजपने मिळवली आहे.

सिंधुदुर्गात स्वतः नारायण राणेच गेल्या वेळी पराभूत झाले. तोपर्यंत राणे फॅक्‍टर जोरदार होता. शिवसेनेने राणेंना दिलेला हा धक्काच होता. नितेश राणे विजयी झाले, तर केसरकरांच्या विजयाने राणेंना आणखी बॅकफूटवर ढकलले. सिंधुदुर्गातील त्यांची ताकद क्षीण होत असताना त्यांचा भाजपप्रवेश युतीच्या भवितव्याची कळ ठरू शकतो. युती झालीच तर नितेश राणे यांना निवडून येताना फार मोठी लढत द्यावी लागेल; मात्र स्वतः नारायण राणे मैदानात उतरले तर सिंधुदुर्गातील लढतीत कलाटणीही मिळू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com