....तो तर उपद्वव्यापी ठाकरे : कर्नाटकच्या माजी मंत्र्याने उधळली मुक्ताफळे

Basavraj Horatti Used Fielty Words About Uddhav Thackeray
Basavraj Horatti Used Fielty Words About Uddhav Thackeray

बेळगाव :  'उद्धव ठाकरे कोण तो? उपद्‌व्यापी ठाकरे आहे तो' अशी मुक्ताफळे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते व माजी मंत्री बसवराज होरट्टी यानी उधळली आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून त्यानी टीका केली. कळसा-भंडुरा योजनेबाबत शेतकऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत सहभागी होण्यासाठी होरट्टी शनिवारी बेळगावात आले होते. 

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी उद्भव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. दोन दिवसापूर्वी बेळगावातील कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या बैठकीत कर्नाटक नवनिर्माण सेनेचा म्होरक्‍या भीमाशंकर पाटील याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याची मागणी केली होती. त्याच कन्नड साहित्य भवनच्या आवारात शनिवारी होरट्टी यानी मुख्यमंत्री ठाकरे व महाराष्ट्रावर टीका केली. राज्याचे शिक्षणमंत्री असताना होरट्टी यानी नेहमीच मराठी विरोधी भूमिका घेतली होती. 

शनिवारी त्यांनी पुन्हा मराठी विरोधात गरळ ओकली.  ते म्हणाले, ''बेळगावचे राजकारणी मतासाठी काय वाट्टेल ते करतात. आमच्यासाठी राज्य महत्वाचे, निवडणूक महत्वाची नाही. बेळगावच्या खासदारानी, आमदारांनी एकत्र येवून सीमावादाबाबत ठाम भूमिका घ्यावी, महाजन अहवालबाबत ठाम रहावे. बेळगावला उपराजधानीचा दर्जा देण्यात येत आहे, त्यामुळे आता ब्रम्हदेव आला तरी येथे काही बदल होणार नाही. याप्रश्‍नी न्यायालयात संघर्ष करावा, न्यायालयाबाहेरही चर्चा करावी. पण बेळगाव कायम कर्नाटकातच राहिल.''

''जुन्या म्हैसूर भागातील कन्नड नेते माझ्या संपर्कात आहेत. आम्ही सर्वजण सीमाप्रश्‍नाबाबत एकत्र राहणार आहोत. येथे काहीही झाले तरी आम्ही येथील कन्नड भाषिकांसोबत आहेत. संपूर्ण देशात कर्नाटक एवढे 'लिबरल' राज्य नाही. बंगळूर शहरात केवळ 21 टक्के कन्नड भाषिक आहेत, बाकीचे सर्व बाहेरचे आहेत. कोणताही विषय असला तरी नको इतका उदारमतवाद नको. अती उदारमतवाद मारक ठरतो हे राजकारण्यांनी समजून घ्यावे. सीमाप्रश्‍नाबाबत कर्नाटकाने महाराष्ट्राच्या एक पाय पुढे असावे. यासाठी एक नको तर दोन मंत्री नियुक्त करा. आवश्‍यकता भासली तरी समिती नियुक्त करा. महाराष्ट्र काय करते त्यापेक्षा अधिक करा. आम्ही गप्प बसलो तरी आम्हालाच गिळंकृत करतील, त्यामुळे दोन चांगले मंत्री नियुक्त करून सीमाप्रश्‍नाबाबत सजग राहणे आवश्‍यक आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com