kannad mla election and shivsena | Sarkarnama

कन्नडची उमेदवारी कुणाला ? शिवसेना इच्छुकांमध्ये स्पर्धा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

औरंगाबाद : जिल्ह्यातील शिवसेना इच्छुकांच्या मुलाखती रविवार आणि सोमवारी मुंबईत शिवसेना भवनात होणार आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कन्नडचे शिवसेनेचे तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलेली बंडखोरी आणि त्यामुळे शिवसेनेचा लोकसभेला झालेला पराभव संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. या मतदारसंघातून जाधव यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेतील इच्छुकांनी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा शिवसेनेलाही काढायचा असल्याने ते उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात घालणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

कन्नडमधून दोनवेळा अपक्ष आणि 2014 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले उदयसिंग राजपूत सध्या शिवसेनेत आहेत. राजपूत यांचा विजय तीनवेळा चार ते पाच हजारांनी हुकला होता. वर्षभरापूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली राजपूत यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. कन्नडमधून उमेदवारी देण्याचे आश्‍वासन त्यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव, आणि नुकत्याच झालेल्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयी झालेले जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. आतापर्यंत उदयसिंग राजपूत यांची उमेदवारी निश्‍चित समजली जात होती, परंतु आता त्यांना पक्षातून अनेक स्पर्धक निर्माण झाले आहेत. उदयसिंग राजूपत यांच्याशिवाय शिवसेनेचे तालुका प्रमुख केतन काजे, डॉ. अण्णा शिंदे, अवचित नाना वळवळे, दिलीप मुठ्ठे आदी इच्छूक मुलाखतीच्या तयारी लागले आहेत. 

कॉंग्रेसचे कोल्हे शिवसेनेच्या वाटेवर ? 
कन्नडच्या नगराध्यक्षा स्वाती कोल्हे यांचे पती संतोष कोल्हे हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा तालुक्‍यात आहे. शिवसेनेकडून उमेदवारीचा शब्द मिळाला तर कोल्हे शिवबंधन बांधून घेण्यास तयार आहेत. दोनवेळा त्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याचे देखील बोलले जाते. त्यामुळे कन्नडमधून शिवसेनेचा उमेदवार कोण असेल ? याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख