कणकवलीत अटीतटीची लढत; 62टक्के मतदान 

प्रमुख लढतीकणकवली : नीतेश राणे (भाजप), सतीश सावंत (शिवसेना)सावंतवाडी :दीपक केसरकर (शिवसेना), राजन तेली (अपक्ष भाजप पुरस्कृत) आणि बबन साळगावकर (राष्ट्रवादी)कुडाळ : वैभव नाईक (शिवसेना), रणजित देसाई (अपक्ष, भाजप पुरस्कृत)
कणकवलीत अटीतटीची लढत; 62टक्के मतदान 

कणकवली :  विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तीन जागांसाठी आज सरासरी 60 टक्के मतदान आज सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत नोंदविण्यात आले. यात पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आणि आमदार नीतेश राणे या दिग्गजासह त्यांच्या स्पर्धकांचे भविष्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. राज्यात कणकवली मतदारसंघात युती नसल्याने शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले. 


यात राणे विरुद्ध शिवसेना असा मुकाबला रंगल्याने कणकवलीची लढत राज्यात लक्षवेधी ठरली आहे. कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघातही शिवसेना उमेदवारांविरोधात भाजप पुरस्कृत उमेदवारांसाठी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यासह भाजपच्या जिल्ह्यातील मंडळींनी जोरदार प्रचार राबवला. त्यामुळे कणकवलीसह कुडाळ आणि सावंतवाडीत काय निकाल लागतो याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

सिंधुदुर्गात आज दिवसभर पावसाची उघडीप होती; मात्र सकाळच्या सत्रात शेतकर्‍यांनी भात कापणीसाठी शेताकडे धाव घेतली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात संथगतीने मतदान झाले. दुपारी उन्हाचा तडाखा असल्याने मतदान केंद्रांवर गर्दी कमी होती. तर दुपारी तीन वाजल्यानंतर सर्वच केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक मतदान केंद्रावरील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनमध्ये वारंवार बिघाड झाल्याने मतदार रांगामध्ये ताटकळत राहिले होते.


 दरम्यान जिल्ह्यातील सखी मतदान केंद्रांवर तयार करण्यात आलेला सेल्फी पॉइंट महिला मतदारांसाठी विशेष आकर्षण ठरला होता.

सिंधुदुर्गात प्रामुख्याने कणकवलीत तगडा मुकाबला असल्याने सर्वच मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याखेरीज शिवसेना आणि भाजपच्या प्रमुख नेतेमंडळींवरही पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. तर शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनाही चोवीस तास पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. आज कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणेने सर्वच मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले होते. तर मतदान केंद्रावरही पाच पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना येण्यास मज्जाव केला जात होता. 


सायंकाळी 5.45 पर्यंत झालेले मतदान

कणकवली 61.35 टक्के

कुडाळ 58.43 टक्के

सावंतवाडी 59.37 टक्के


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com