Kanhaiyya Criticises Modi again | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

कन्हैय्याकुमारची पुन्हा मोदींवर टीका

गायत्री वाजपेयी
शुक्रवार, 19 मे 2017

लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याला अतिशय महत्व असते. मात्र देशात विरोधी पक्षाचे अस्तित्वच नष्ट होत आहे. संसदेत विरोधी पक्ष प्रमुख नाही. सत्तेतील लोक आपल्याला जाब विचारण्यासाठी कोणीही नाही, त्यामुळे आपण वाटेल ते करू शकतो अशा गुर्मीत ते वागत आहेत. - कन्हैया कुमार

पुणे - 'गो-रक्षा पथक, अॅन्टी रोमिओ' पथकांद्वारे कारवाया करत सध्याचे सरकार समाजामध्ये हिंसेला प्रोत्साहन देत आहे. एकाच व्यक्तीच्या हाती सत्ता देऊन तिचे केंद्रीकरण केले जात आहे. सत्तेचे केंद्रीकरण आणि सामाजिक हिंसा यांद्वारे देशात हुकूमशाही राबविली जात आहे, असे वक्तव्य करत दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील(जे एन यू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याने आज केले.

एका कार्यक्रमाच्या घोषणेनिमित्त पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत कन्हैयाकुमार याने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पूनावाला, जे एन यू विद्यार्थी संघटनेच्या माजी उपाध्यक्षा शेहला रशीद, उणा आंदोलनाचे कार्यकर्ते जिग्नेश मेवाणी उपस्थित होते. यावेळी कन्हैय्या कुमार म्हणाला, ''देशात आतापर्यंत विविध आघाड्यांचे सरकार होते. मात्र, सध्या मोदी सरकार, योगी सरकार अशी नावे आपल्याला ऐकायला मिळतात. यातूनच सत्तेचे केंद्रीकरण होत आहे. त्याबरोबरच विविध कायदे लागू करून त्यांचा विरोध करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या सर्वांद्वारे राज्यघटनेमध्ये बदल घडवून भारताला हिंदू राष्ट्र करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस आहे.''

लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याला अतिशय महत्व असते. मात्र देशात विरोधी पक्षाचे अस्तित्वच नष्ट होत आहे. संसदेत विरोधी पक्ष प्रमुख नाही. सत्तेतील लोक आपल्याला जाब विचारण्यासाठी कोणीही नाही, त्यामुळे आपण वाटेल ते करू शकतो अशा गुर्मीत ते वागत आहेत. अशा सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी, राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी विविध संस्थांना एकत्रित करून एक दबाव गट तयार करणार असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख