kanhaiya kumar in Nagpur ? | Sarkarnama

कन्हैय्याकुमारला दीक्षाभूमीवर रोखणार? 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

येत्या 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला दीक्षाभूमीवर जाऊन आदरांजली अर्पण करण्याला विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार जिल्हा प्रशासनातर्फे परवानगी मिळण्याची शक्‍यता नाही. 

नागपूर : येत्या 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला दीक्षाभूमीवर जाऊन आदरांजली अर्पण करण्याला विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार जिल्हा प्रशासनातर्फे परवानगी मिळण्याची शक्‍यता नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 एप्रिलला नागपुरात येत आहेत. ते सुद्धा दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. नागपुरातील दीक्षाभूमीवर पोलिस तैनात झाले आहेत. गुरुवारी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनीही दीक्षाभूमीची पाहणी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. प्रशासनाकडून अद्यापही पंतप्रधानांच्या दौऱ्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. "संभाव्य दौरा' म्हणून जिल्हा प्रशासनाने तयारीला सुरवात केली आहे. 

पंतप्रधानांचा दौरा निश्‍चित झाल्यास कन्हैय्याकुमारला दीक्षाभूमीवर प्रवेश करण्यास अडचणी येऊ शकतात. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाचा अध्यक्ष कन्हैय्याकुमारच्या काही महिन्यापूर्वी झालेल्या नागपूर दौऱ्यात अभाविप, बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्यावेळी कन्हैय्याकुमारवर चप्पल फेकली होती. यामुळे कन्हैय्याकुमारच्या या दौऱ्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ही शक्‍यता लक्षात घेऊन कन्हैय्याकुमारच्या दीक्षाभूमीवरील प्रवेशावर अनिश्‍चितता आहे. 

कन्हैय्याकुमार नागपूरहून गोंदिया येथे जाणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पोलिस व प्रशासन कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कन्हैय्याकुमारला दीक्षाभूमीवर जाऊ देणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख