कंगना आणि पत्रकारांमधील वाद चिघळला

कंगना आणि पत्रकारांमधील वाद चिघळला

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत आणि पत्रकारांमधील वाद आता आणखीनच चिघळला आहे. आता कंगनाने पत्रकारांविरोधात एक नोटीस काढली आहे. "काही पत्रकार पत्रकारितेच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. काही पत्रकार असे आहेत की जे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत आहेत. अशा पत्रकारांमुळे इतर लोकांची प्रतिमा खराब होते.' असे या नोटीसमध्ये लिहिण्यात आले आहे. कंगनाच्या वकिलांनी ही कायदेशीर नोटीस पत्रकारांना पाठविली आहे.

"जजमेंटल है क्‍या' या चित्रपटाच्या एका पत्रकार परिषदेदरम्यान कंगना आणि पत्रकारामध्ये झालेला वाद वेगळच वळण घेत आहे. कंगनाची बहिण रंगोली चंदेली हिने पत्रकारांविरोधात ट्विट करत या वादामध्ये उडी घेतली. तर "जजमेंटल है क्‍या'ची निर्माती एकता कपूर हिने मीडियाची माफी मागत कंगना आणि पत्रकारामधील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुन्हा एकदा कंगनाने पत्रकारांना नोटीस पाठवल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com