कमलनाथ थोड्याच वेळात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार

मध्य प्रदेशात बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. मध्य प्रदेशातले काँग्रेसचे सरकार त्यामुळे अवघ्या पंधरा मिनिटांत कोसळले आहे
Kamalnath decided to Resign from Cm's post
Kamalnath decided to Resign from Cm's post

भोपाळ : मध्य प्रदेशात बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे.  मध्य प्रदेशातले काँग्रेसचे सरकार त्यामुळे अवघ्या पंधरा मिनिटांत कोसळले आहे. राजीनामा देण्याचे जाहीर करण्यापूर्वी कमलनाथ यांनी पत्रकार परिषद घेतली. 

या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर आरोप केले. भाजपने लोकशाहीचा गळा घोटला असा आरोप त्यांनी केला. काही वेळातच कमलनाथ राज्यपालांना भेटून राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण करणार आहे.  मध्य प्रदेशमध्ये आज (ता. २०) विश्‍वासदर्शक ठराव मांडण्याचे आदेश काल सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पण त्यापूर्वीच कमलनाथ यांनी आपला निर्णय जाहीर केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केल्याने मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप झाला. त्यानंतर या सगळ्या घडामोडी घडल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com