kamalnath must resign badal said | Sarkarnama

मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा घ्या, बादल यांची सोनिया गांधीकडे मागणी 

वृत्तसंस्था
बुधवार, 19 डिसेंबर 2018

चंडीगड : शीख हत्याकांडात सहभागी असल्याचा आरोप करीत मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा राजीनामा कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घ्यावा अशी मागणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकीाल दलाचे नेते प्रकाशसिंह बादल यांनी केली आहे. 

1984 मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या दंगलीत कॉंग्रेसचेने नेते सज्जनगड,जगदीश टायटलर आणि कमलनाथ यांच्या चेतावनीमुळे गोरेगरीब आणि निष्पाप शीख बांधवांना लक्ष्य करण्यात आले. सज्जनकुमार यांना जन्मठेप झाली आहे. आता त्यांच्या पाठोपाठ टायटलर आणि कमलनाथ यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोचणार आहे. कानून के हात लंबे होते है असे सांगत कमलनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोनिया गांधी यांनी घेतला पाहिजे असे बादल म्हणाले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख