भोपाळमध्ये महाराष्ट्र भवन उभारावे : कमलनाथ

..
KAMALNATH
KAMALNATH

वाशी :  महाराष्ट्रानेदेखील भोपाळमध्ये महाराष्ट्र भवन उभारावे, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केले. ते वाशी, सेक्‍टर 30 ए मध्ये मध्यालोक तथा मध्य प्रदेश भवन या इमारतीच्या उद्घाटनप्रंसगी बोलत होते. या वेळी मध्य प्रदेशच्या सामान्य प्रशासनाचे मंत्री डॉ. गोविंद सिंह, पर्यटन व नर्मदा खोरे विकास विभागाचे सुरेंद्र सिंह बघेल उपस्थित होते.

या वेळी कमलनाथ म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे; तर मध्य प्रदेशमधील इंदूर, भोपाळ हे आर्थिक राजधानीचे शहर नसले तरी व्यापाऱ्यांची राजधानी नक्की बनेल. मध्य प्रदेशमधील सुमारे 5 लाख नागरिक हे मुबईत वास्तव्य करतात. त्यांच्यासाठी वर्षी येथे उभारण्यात आलेले  मध्य प्रदेश भवन अत्यंत उपयुक्त ठरेल. हे भवन फक्त श्रीमंतासाठी न राहता गरिबांसाठीही उपलब्ध व्हावे. मध्य प्रदेशमधून मुंबईमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांनादेखील या भवनाचा फायदा होईल.

 भविष्यात देशासमोर मोठी आव्हाने असून, युवा पिढीने पुढे येणे आवश्‍यक आहे. युवापिढी आल्यानंतरच देशाचा विकास होईल, सर्वच राज्यांमधील नागरिकांना मध्य प्रदेशमध्ये त्यांची भवन बांधावीत, अशी इच्छाही कमलनाथ यांनी या वेळी व्यक्त केली.

याशिवाय जम्मू काश्‍मीरला विशेष दर्जा देणाऱ्या 370 कलमासंदर्भात बोलताना कमलनाथ म्हणाले की, शेजारी देश पाकिस्तान हा दहशतवादाचे मूळस्थान आहे. जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवाद असो वा जागतिक दहशतवाद असो, यांचे मूळ पाकिस्तानात आहे. हे संपूर्ण जगात सर्वश्रूत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com