कमलकिशोर आणि मलाही सी ग्रेड; तरी आम्ही शिक्षणमंत्री झालो : शरद पवार

...
sharad pawar felicitates baburao kadam
sharad pawar felicitates baburao kadam

औरंगाबादः "कमलकिशोर कदम यांनी आपल्या भाषणात बाबुराव कदम यांना नेहमीच शिक्षणात ए ग्रेड मिळायचा, मला मात्र नेहमीच सी ग्रेड असा उल्लेख केला. पण मलाही कधी अभ्यासात चाळीस टक्‍यांपेक्षा जास्त मार्क मिळाले नाही. तुम्हालाही सी ग्रेड आणि मलाही सी ग्रेड तरी आपण शिक्षणमंत्री झालो', अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी कमलकिशोर कदम यांची फिरकी घेतली.

औरंगाबाद येथील एमजीएमच्या रुख्मणी सभागृहात संस्थेचे विश्‍वस्त अंकुशराव कदम यांचा अमृत महोत्सवी साहेळा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी एमजीएमच्या उभारणीपासून ते या संस्थेचे देशभरात पसरलेले जाळे आणि त्यांची धुरा सांभाळणारे अंकुशराव कदम यांच्या संदर्भातील आठवणींना उजाळा दिला.

शरद पवार म्हणाले, कमलकिशोर कदम यांनी आपल्या भाषणात बाबुराव यांना ए ग्रेड मिळायचा आणि मला सी याचा उल्लेख केला. पण काही हरकत नाही, मला देखील कधी चाळीस टक्‍यांच्यावर गुण मिळाले नाही. मलाही सी ग्रेडच असायचा. तुम्ही आणि मी सी ग्रेड असूनही राज्याचे शिक्षणमंत्री झालो असा टोला पवारांनी लगावताच सभागृहाने टाळ्या वाजवून दाद दिली. सार्वजनिक आणि राजकीय जीवनात माणसे सांभाळावी लागतात, असेही पवार म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com