कसब्यात बंडखोरी; पुण्याच्या प्रथम महिला महापौर मैदानात

कमल व्यवहारे या 1992 ते 2017 याकाळात नगरसेविका होत्या.
कसब्यात बंडखोरी; पुण्याच्या प्रथम महिला महापौर मैदानात

पुणे: गेली 35 वर्षे काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या पुण्याच्या प्रथम महिला महापौर कमल व्यवहारे यांनी पक्षाने दिलेला उमेदवार अमान्य करत आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.

कमल व्यवहारे या अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्य आहेत. त्यांनी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही भुषवले आहे. त्या महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसही होत्या. यावेळी तिकीटासाठी आग्रही होत्या, त्यांनी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले, मात्र उमेदवारी अरविंद शिंदे यांना मिळाली. शिंदे हे मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत, असे व्यवहारे यांचे मत आहे. त्यामुळे त्यांचा प्रचार न करता स्वत: निवडणुकीत रिंगणात उतण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com