Kamal Nath follows Raj Thakre's path ,says jobs for locals only | Sarkarnama

कमलनाथांनी बांधला राज ठाकरेंचा गंडा ! म्हणाले  स्थानिकांनाच नोकरी द्या !

सरकारनामा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

.

भोपाळ : काँग्रेसचे नेते आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज ठाकरेंकडून गुरुमंत्र घेऊन त्याचा गंडा बांधला की काय असा प्रश्न  पडावा असे कमलनाथ बोलू लागले आहेत . मुख्यमंत्री होताच कमलनाथ यांनी उद्योजकांना इशारा दिलाय की खबरदार बिहारचे कामगार आणाल तर !

उद्योजकांनी ८० टक्के  नोकऱ्या स्थानिक युवकांनाच दिल्या तर ठीक आहे नाही तर आम्ही राज्य सरकारकडून दिली जाणारी सबसिडी आणि इतर सवलती देणार नाही ! आमची  सबसिडी   घेता आणि नोकऱ्या  बिहार आणि बाहेरच्या प्रांतातून येणाऱ्या लोकांना देता हे खपवून घेतले जाणार नाही , असा सज्जड दमच कमलनाथ यांनी जाहीरपणे उद्योगपतींना भरला आहे . 

एक काँग्रेसचा नेता आणि एक काँग्रेस पक्षाचा जबाबदार मुख्यमंत्री हे बोलतोय . कमलनाथ हे स्वतः मोठे उद्योगपती आहेत . त्यांच्या २३ कंपन्या संस्था आहेत . शेकडो कोटींचा त्यांचा कारभार त्यांची दोन मुले पाहतात . स्वतः एक उद्योजक असून ते जर असे बोलतात तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनाच राज ठाकरे का चालत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणार आहे . 

आगामी लोकसभा निवडणुका समोर ठेवून जर ते असे बोलत असतील असे आपण गृहीत धरले तरी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आता यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल . ते फेरीवाल्यांचा आणि उत्तर भारतीयांचा मोर्चा कमलनाथ यांच्या कार्यालयावर नेतात काय याकडे मुंबईकरांचे लक्ष्य लागलेलं आहे . 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख