कल्याणमध्ये बोलबाला 'शिंदे'शाहीचाच !

शिवसेनेतील महत्वाचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात आपला प्रभाव निर्माण केला असून ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन मतदारसंघावरील आपली पकड त्यांनी पक्की केली आहे .
Dr. Shrikant Shinde - Babaji Patil
Dr. Shrikant Shinde - Babaji Patil

श्रीकांत शिंदे यांच्या विजयाची कारणे 
- एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र 
- युतीला आगरी समाजाचा पाठिंबा 
- भाजप आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी शिंदे यांचे चांगले संबंध 
- कार्यकर्त्यांचा स्थानिक पातळीवरील उत्तम जनसंपर्क 
- एमएमआरडीएच्या माध्यमातून विकासकामांच्या केलेल्या घोषणांचा फायदा 

बाबाजी पाटील यांच्या पराभवाची कारणे 
- राष्ट्रवादीतील गटबाजी 
- शहरी भागात जनसंपर्क नाही 
- आगरी समाजाच्या मुद्द्याला अधिक महत्त्व 
- मनसे फॅक्‍टर अपयशी   

कल्याण  : युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून अनेक दिग्गज नावे चर्चेत होती; मात्र विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या बाबाजी पाटील यांच्या गळ्यात राष्ट्रवादीने उमेदवारीची माळ घातली.

आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले पाटील हे आगरी समाजाचे असल्याने शिंदे यांच्याविरोधात "आगरी कार्ड" खेळविण्याचे मनसुबे राष्ट्रवादीचे होते. मात्र राष्ट्रवादीचा हा मनसुबा यशस्वी होऊ शकला नाही. 

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच धनुष्यबाणाने घड्याळाला घायाळ केले अन्‌ उत्तरोत्तर घड्याळाची टिकटिक ही कमीच होत गेली. आगरी समाजाचा मुद्दा सुरुवातीपासून या ठिकाणी चर्चेत राहिला. त्यामुळे शिवसेनेचे मताधिक्‍य गतनिवडणुकीच्या तुलनेत कमी होईल, अशी शक्‍यता होती. त्यात मनसेचे इंजिनही घड्याळाच्या मदतीला धावून आल्याने मनसेची सुमारे एक ते दीड लाख मतेही राष्ट्रवादीला मिळतील, असे बोलले जात होते; मात्र शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत संध्याकाळी 4 वाजेपर्यंतच दोन लाखांहून अधिक आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले होते. 

इतर मुद्द्यांपेक्षा आगरी समाजाचा मुद्दा राष्ट्रवादीने प्रकर्षाने उचलून धरला होता. बाबाजी पाटील हे शिवसेनेचे वजन असलेल्या ठाणे महापालिकेचे नगरसेवक असल्याने पुढील काळात त्यांना अडचणी निर्माण होऊ शकतील, अशी चर्चा दबक्‍या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू आहे. 2014 च्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे अशी तिरंगी लढत झाली होती.

यंदा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मुख्य लढत असली तरी 'वन ऍण्ड ओन्ली सेना' असे काहीसे चित्र होते. तसेच आपल्या पाठीमागे आगरी समाज भक्कमपणे उभा असल्याचे शिंदे यांनी वेळोवेळी दाखवून दिले. त्यामुळे इंजिन मदतीसाठी पुढे येऊनही घड्याळ्याचा गजर काही झाला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com