भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांची वाताहात - डॉ.कल्याण काळे - kalyan kale and state election | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांची वाताहात - डॉ.कल्याण काळे

नवनाथ इधाटे
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

फुलंब्री : भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांची वाताहत होत असून अजूनही बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांनी केला आहे. फुलंब्री विधानसभा मतदार संघात डॉ. कल्याण काळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारा दरम्यान ते भाजप सरकार व त्यांच्या योजना कशा फसव्या आहेत हे मतदारांना पटवून सांगत आहेत. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून केवळ आश्‍वासनांचे गाजर देत आहे. केवळ कागदपत्रांच्या माध्यमातून विकास आणि योजना राबवल्याचे दाखवीत आहे.

फुलंब्री : भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांची वाताहत होत असून अजूनही बहुतांश शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. सरकारची कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांनी केला आहे. फुलंब्री विधानसभा मतदार संघात डॉ. कल्याण काळे यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारा दरम्यान ते भाजप सरकार व त्यांच्या योजना कशा फसव्या आहेत हे मतदारांना पटवून सांगत आहेत. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून केवळ आश्‍वासनांचे गाजर देत आहे. केवळ कागदपत्रांच्या माध्यमातून विकास आणि योजना राबवल्याचे दाखवीत आहे. त्यामुळे शासनाच्या योजना कागदापुरत्याच मर्यादित असल्याचा टोला काळे यांनी प्रचार सभेत बोलतांना लगावला. 

गरजू लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याने जनतेमधून आता भाजप विरोधात प्रचंड आक्रोश निर्माण होत आहे. सरकारला वठणीवर आणण्यासाठी फुलंब्री तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांना सोबत घेऊन वेळोवेळी मोठे मोर्चे काढून शासनाला वठणीवर आणण्याचे काम कॉंग्रेस पक्षाने केल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले. मागील सत्तर वर्षात जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाही, तेवढ्या आत्महत्या केवळ भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात झाल्या. अनेक शेतकऱ्यांनी नापिकीमुळे आत्महत्येसारखे निर्णय घेतले. तरीही भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी केली नाही असा आरोप करतांनाच शेतकऱ्यांचा रोष येत्या 21 तारखेला मतदानातून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्‍वास देखील कल्याण काळे यांनी यावेळी व्यक्त केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख