कल्याण ग्रामीणमध्ये नोटाला ६ हजार मते पडली नसती तर निकाल वेगळा लागला असता का ? 

विजयी उमेदवार प्रतिक्रीयायेथील स्थानिकांशी माझी लढाई नव्हती,तर ठाण्यातील शिंदेशाहीशी होती. महायुतीचा पराभव हा स्थानिकांचा नसून शिंदेशाही पिता-पुत्रांचा आहे.महापालिका निवडणुका येत आहेत त्यादृष्टीने विकासकामांना प्राधान्य देण्यात येईल. 27गावे महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचेच आभार मानतो.
Ramesh mhatre raju patil
Ramesh mhatre raju patil

ठाणे - कल्याण ग्रामीण मतदारसंघात सेना - मनसे यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढाईत मनसेने शेवटच्या फेरीत डाव पलटत विजयश्री खेचून आणली. अगदी पहिल्या फेरिपासून ते शेवटच्या फेरिपर्यंत विजय नक्की कोणाचा याची उत्कंठा कार्यकर्त्यांमध्ये ताणली गेली होती.

 शेवटच्या चार पाच फेऱ्यांत मनसेचे राजू पाटील यांनी चार हजारांनी लीड घेत बाजी मारताच मनसेच्या गटात एकच जल्लोष झाला. 

कल्याण ग्रामीण हा सेनेचा बालेकिल्ला असला तरी विधानसभा मतदारसंघात मनसेनेही एक काळ गाजविला होता, पुन्हा या मतदारसंघावर आपले वर्चस्व निर्माण करण्यात ते यशस्वी झाल्याचे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट झाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रचारसभेत मजबूत विरोधी पक्ष म्हणून निवडून देण्याचे आवाहन केले होते. 

परंतू त्याला फारसे यश लाभले नाही. महाराष्ट्रात केवळ कल्याण ग्रामीणमध्येच मनसेने एक आमदारकी मिळवत मागच्या निवडणुकीचा कित्ता गिरवला.कल्याण ग्रामीण मतदारसंघात महायुतीने सुभाष भोईर यांचे तिकीट ऐन टाईमला कापून ते रमेश म्हात्रे यांना दिले गेले.

 सेनेतील अंतर्गत नाराजी उघड झाल्याने त्याचवेळी सेनेची लढाई ही सोप्पी नाही यावर शिक्का मोर्तब झाले होते. मनसेचे राजू पाटील हे सेनेतील अंतर्गत नाराजीचा फायदा उठवित सेनेच्या गडाला खिंडार पाडण्यात यशस्वी झाल्याचे 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरुन स्पष्ट झाले. 


मतमोजणीला सुरुवात होताच पहिल्या फेरिपासूनच मनसेचे राजू पाटील हे एक ते दिड हजाराच्या फरकाने आघाडीवर होते. मतमोजणी केंद्राबाहेरही मनसेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सकाळपासूनच सुरु होता. तर सेनेचे कार्यकर्ते हे एका ठिकाणी शांत बसून असल्याचे दिसून आले. नवव्या फेरिपर्यंत राजू पाटील यांनी आघाडी घेतली होती परंतू दहाव्या फेरीत अचानक बाजी पलटत महायुतीचे रमेश म्हात्रे यांनी लीड घेतल्याने युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयाच्या आशा पल्लवित झाल्या.

 यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु झाली. 

चोवीसाव्या फेरीच्या दरम्यान अगदी 200 चा फरक राहिल्याने युतीचे कार्यकर्ते चिंतेत पडले होते. अखेर मनसेने सव्वीसाव्या फेरीत पूर्ण डाव पलटत चार हजारांचा लीड घेत आपल्या विजयावर शिक्का मोर्तब केले. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. विजयाचे संकेत मिळताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत विजयाचा जल्लोष केला. वरुण राजानेही त्यांच्यावर वर्षाव करीत त्यांचा आनंद द्विगुणीत केला. तर सेनेचे कार्यकर्ते निराश होत संपूर्ण निकाल न ऐकताच निघून गेले.


रमेश म्हात्रेंचा दुसऱ्यांचा पराभवकल्याण ग्रामीण हा सेनेचा बालेकिल्ला असला तरी विधानसभेत 2009 ला मनसेचे रमेश पाटील यांनी युतीचे रमेश पाटील यांचा पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत रमेश म्हात्रे यांनी तिकीट मागितले होते, परंतू त्यांना ते न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. सेनेच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी केली होती. 

दरम्यान सेनेचे सुभाष भोईर यांनी मनसेचे रमेश पाटील यांना पराभूत केले होते. 2019 च्या निवडणुकीत पुन्हा म्हात्रे यांनी उमेदवारी मागितली, 2014 ला त्यांना शब्द दिल्याने यावर्षी भोईर यांचे तिकीट कापत म्हात्रे यांना तिकीट देण्यात आले. परंतू 2009 ची पुनरावृत्ती होत रमेश म्हात्रे यांना पुन्हा पराभव स्विकारावा लागला आहे.


सात हजारांच्या फरकांनी मनसेचा विजय

मनसेचे राजू पाटील यांना 93 हजार 927 मते तर महायुतीचे रमेश म्हात्रे यांना 86 हजार 773 मते मिळाली. सात हजार मतांच्या फरकांनी महायुतीचा पराभव झाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अमोल केंद्रे यांनी 6 हजार मते मिळविली.


 शहरातील समस्यांना नागरिक त्रासलेले असल्याने त्यांनी नोटाला मतदान करुन आपली नाराजी दर्शविली. कल्याण ग्रामीण मधून तब्बल 6 हजार 92 नोटांना मतदान झाले आहे. या सहा हजारांचा फटकाही महायुतीला बसला असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com