kalidas kolambkar mla | Sarkarnama

आजचा वाढदिवस : कालिदास कोळंबकर, आमदार, कॉंग्रेस

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

कालिदास कोळंबकर यांची ओळख सध्या कॉंग्रेसचे आमदार अशी असली तरी ते मुळचे शिवसेनेचे आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरवातही शिवसेनेतून झाली. नारायण राणेचे कडवे समर्थक म्हणूनही ते ओळखले जातात. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्याबरोबर ते कॉंग्रेसमध्ये गेले. मुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघातून ते कॉंग्रेसच्या तिकिटावर (2014) निवडून आले आहेत. कोळंबकर यांची ही सातवी टर्म आहे. मुंबईतील बीडीडी चाळ, गिरणगावात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. शांत, संयमी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख