ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष 

ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष 

मुंबई : विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. 

या पदासाठी विधिमंडळातून सहा ज्येष्ठ आमदारांची यादी राज्यपाल भगत सिंह कोश्‍यारी यांच्याकडे काल पाठवण्यात आली होती. यापैकी एकाची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड राज्यपाल करणार होते. थोरात की कोळंबकर अशी दोन नावे पुढे आली होती. अखेर कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे. 

राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर, बबनराव पाचपुते, बाळासाहेब थोरात, के सी पाडवी, दिलीप वळसे पाटील यांची यादी काल देण्यात आली होती. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांची निवड करण्यात आली होती. कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. हंगामी अध्यक्ष उद्या सर्व आमदारांना शपथ देणार आहेत.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com