कायगाव पुलावर बसवला काकासाहेब शिंदे यांचा पुतळा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कानडगाव (ता. गंगापूर) येथील युवक काकासाहेब शिंदे यांनी इशारा देऊन २३ जुलै २०१८ला दुपारी सव्वातीनच्या सुमारास कायगाव पुलावरुन गोदावरी नदीत उडी घेतली होती.आज या घटनेला एक वर्ष पुर्ण झाले.
कायगाव पुलावर बसवला काकासाहेब शिंदे यांचा पुतळा

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या काकासाहेब शिंदे यांचा कायगाव पुलावर (ता. गंगापूर) सोमवारी (ता. २२) रात्री पुतळा बसविण्यात आला. काकासाहेब यांचा आज (ता. २३) पहिला स्मृती दिन आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी कानडगाव (ता. गंगापूर) येथील युवक काकासाहेब शिंदे यांनी इशारा देऊन २३ जुलै २०१८ला दुपारी सव्वातीनच्या सुमारास कायगाव पुलावरुन गोदावरी नदीत उडी घेतली होती. आज या घटनेला एक वर्ष पुर्ण झाले.

काकासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवप्रेमींनी सोमवारी रात्रीच कायगाव पुलाच्या सुरवातीलाच चबुतरा उभारत काकासाहेब शिंदे यांचा पुतळा बसविण्यात आला आहे. दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी हा पुतळा बसवला आहे. गेल्यावर्षीच्या घटनेनंतर कायगाव पुलाचे नामकरण 'हुतात्मा काकासाहेब शिंदे सेतू' असे करण्यात आले आहे. कायगाव पुलावर मराठा समाज बांधवांची गर्दी नसली तरी, तणावपूर्ण शांतता आहे.

औरंगाबाद पुणे महामार्गावर हा पुल असल्याने औरंगाबादहुन येणारी वाहने गंगापूर फाट्यापासून वळविण्यात आली. तर, पुण्याहुन येणारी वाहने नेवासा फाट्यापासून वळवली आहे.


हायलाईट...,
* क्युआरटी (दंगा काबू पथक) ३, वरुण वॉटर पॅनल १, 
३ उपविभागीय पोलीस अधिकारी, ४ पोलीस निरीक्षक,१३ पोलीस उपनिरीक्षक, २४० कर्मचारी यांचा फौजफाटा आहे.

* अग्निशमनचे वाहन, रबर बोट आणि अग्निशमनचे वाहन असून सोबत अधिकारी, कर्मचारी मिळून १५ जणांची टीम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com