सावता, समता परिषदेचा कैलास गोरंट्याल यांना पाठिंबा

सावता, समता परिषदेचा कैलास गोरंट्याल यांना पाठिंबा

जालना : माळी समाजामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळालेला आहे, आणि आज मला या समाजाने पाठिंबा देऊन माझ्या विजयाचा मार्ग सुकर केला असा विश्‍वास जालना विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेस - राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केला. तालुक्‍यातील सतरा गावातील सावता परिषद आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांच्या प्रचार कार्यालयात पार पडला. या बैठकीत आपल्या भावना व्यक्त करताना गोरंट्याल म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत समता परिषदेचे नेते छगन भुजबळ यांनी जालना येथे परिषदेचा पहिला मेळावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना आरक्षण मिळवून दिले होते. 

या घटनेचा मी आणि डॉ. पंडीतराज धानुरे हे साक्षीदार आहेत. माळी समाजाच्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसींना न्याय मिळालेला आहे आणि आज मला या समाजाने पाठींबा देऊन माझ्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. नगरपालिकेतील सत्तेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्याच्या सुविधा पोहचवण्याचे काम केले आहे. यापुढेही आपण शहराच्या विकासासाठी कटिबध्द राहणार आहोत. 

जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी ओबीसी समाज घटकाला त्यांच्या हक्काची जाणीव आता झालेली आहे. इथून पुढे राजकारणामध्ये त्यांना डावलण्याची हिंमत कोणत्याही पक्षाकडून होणार नाही. म्हणून ओबीसी समाजाने एकजूट राखावी असे आवाहन मेळाव्यात बोलतांना केले. यावेळी कैलास गोरंट्याल यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com