कडकनाथ कोंबडीने भाजप शिवसेनेला झटका दिला!

शेतकऱ्यांचा आक्रोश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकला नाही.
कडकनाथ कोंबडीने भाजप शिवसेनेला झटका दिला!

पुणे: "कडकनाथ कोंबडीचा भाजप शिवसेनेला फटका बसला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही कडकनाथ प्रकरणातील सूत्रधारांना पाठीशी घातले त्याचा राग लोकांनी मतपेटीतून काढला."असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

"सांगली ,सातारा आणि कोल्हापूर जिल्हयात कडकनाथ कोंबडीच्या नावाखाली शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली. शेतकरी आक्रोश करत सरकारकडे दाद मागत होते. मात्र शेतकऱ्यांचा आक्रोश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐकला नाही. त्यांनी कडकनाथ प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला पाठीशी घातले आणि कडकनाथ कोंबडीच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या विरोधात जे आंदोलन करत होते. त्या कार्यकर्त्यावर मात्र कडक कारवाई केली. शेतकऱ्यांना हे आवडले नाही. शेतकरी पेटून उठला आणि त्याने विरोधात मतदान केले. कडकनाथ कोंबडीने युतीला झटका दिला."असे शेट्टी म्हणाले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com