k chandrashekhar rao about asaduddin owaisi | Sarkarnama

ओवैसी मुलतत्ववादी नाहीत, ते तर देशपातळीवरील बुद्धीवादी!

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

ओवैसींना काँग्रेससह अनेक पक्ष मुलतत्ववादी ठरवत असताना के. चंद्रशेखर राव यांनी त्यांना 'सेक्युलर' म्हटले आहे.

पुणे: एमआयएम पक्षाचे अध्यक्ष, खासदार असदुद्दीन ओवैसी हे मुलतत्ववादी नाहीत. ते देशपातळीवरील बुद्धीवादी नेते आहेत. त्यामुळे त्यांना घेवून देशभर फिरणार असल्याचे 'टीआरएस' प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी सांगितले.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर के. चंद्रशेखर राव हैद्राबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

ओवैसीसंबंधीच्या प्रश्नावर राव म्हणाले, ओवैसी हे मुलतत्ववादी नाहीत. ते बुद्धीवादी नेते आहेत. ते सेक्युलर आहेत. लोकसभेतील डिबेटमध्ये ते सहभागी असतात, हे देशाला माहित आहे. काल त्यांच्याबरोबर तीन तास चर्चा केली. आम्ही आता देशभर फिरणार आहोत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख