jyotiraditya shinde in shadow after priyanaka`s entry | Sarkarnama

प्रियांका गांधींच्या झोतात ज्योतिरादित्य शिंदे अंधारात!

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 23 जानेवारी 2019

पुणे : काॅंग्रेसने आज ऐतिहासिक निर्णय घेत प्रियंका गांधी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केली. त्यांच्यासोबत ज्योतिरादित्य शिंदे यांनाही नेमले. दोघांनाही उत्तर प्रदेशची जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. पण चर्चा केवळ प्रियंका गांधी यांचीच होत आहे.

पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी ही गांधी यांच्याकडे आणि पश्चिमची शिंदेंकडे असणार आहे. दोघांकडेही प्रत्येकी ४० लोकसभा मतदारसंघ असतील. त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचे मतदारसंघ हे गांधी यांच्या विभागात आहेत. गांधी घराण्याचे परंपरागत अमेठी आणि रायबरेली हे लोकसभा मतदारसंघ देखील गांधी यांच्याकडे आहेत. 

शिंदे यांच्यावरही राहुल गांधी यांनी मोठा विश्वास टाकला आहे. शिंदे यांनी मध्य प्रदेशमध्ये पक्षाची कामगिरी उंचावली होती. त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र तेथे कमलनाथ यांना संधी मुख्यमंत्रिपदावर संधी मिळाली. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद नाकारले होते. भविष्यात मोठी जबाबदारी शिंदे यांच्याकडे देण्याचे सूतोवाच राहुल यांनी तेव्हा केले होते. त्यानुसार उत्तर प्रदेशची निम्मी जबाबदारी देऊन राहुल यांनी त्यांचा मान राखला आहे.

प्रियांका गांधी यांच्याच नियुक्तीची माध्यमांतून एवढी चर्चा झाली की शिंदे यांचा उल्लेखही फारसा कोणी केला नाही. गांधी घराण्यातील व्यक्तींच्या राजकीय उदयापुढे इतर नियुक्त्या दुर्लक्षित राहणे स्वाभाविक आहे. काॅंग्रेसचे हेच वैशिष्ट्य आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख