ज्योतिरादित्य शिंदेंना हवेय मुख्यमंत्रीपद

मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कमलनाथ यांच्याकडे गेल्यापासून ज्योतिरादित्य आणि दिग्विजयसिंह यांनी डावप्रतिडाव टाकून कमलनाथ यांना नामोहरण करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. ज्योतिरादित्य हे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रिपदावर दावा सांगत आहेत. दुसरीकडे दिग्विजयसिंह यांनीही राज्य सरकारमध्ये निर्णायक स्थान निर्माण केले आहे.
Jyotiraditya Scindia
Jyotiraditya Scindia

भोपाळ : मध्य प्रदेशातील सत्ताधारी कॉंग्रेस पक्षातील तीन दिग्गज नेत्यांमध्ये सध्या वर्चस्वाची लढाई सुरू आहे. मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आली असून, तिन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून ही राजकीय साठमारी सुरू आहे. मध्य प्रदेशात कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ, माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह असे तीन प्रबळ गट आहेत. 

मुख्यमंत्रिपदाची खुर्ची कमलनाथ यांच्याकडे गेल्यापासून ज्योतिरादित्य आणि दिग्विजयसिंह यांनी डावप्रतिडाव टाकून कमलनाथ यांना नामोहरण करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते. ज्योतिरादित्य हे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रिपदावर दावा सांगत आहेत. दुसरीकडे दिग्विजयसिंह यांनीही राज्य सरकारमध्ये निर्णायक स्थान निर्माण केले आहे.

मध्य प्रदेशातील कॉंग्रेस पक्ष आणि गटातटांची भांडणे हे समीकरण काही आताची नाहीत. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारख्या बलवान नेत्यांकडे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा होती त्या वेळीसुद्धा मध्य प्रदेशात पक्षात गटबाजीचे राजकारण सुरूच होते. सध्या राज्याचे मुख्यमंत्री कमलनाथ आहेत. मात्र सरकार दिग्विजयसिंह चालवत आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहिल्यास असे दिसते, की कमलनाथ यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असले तरी ताकद मात्र दिग्विजयसिंह यांची वाढलेली दिसते आहे.

कमलनाथ यांच्यावर दबाव तयार करण्यात 'दिग्गी राजा' यशस्वी ठरल्याचे जाणकार सांगतात. मध्य प्रदेशातील राजकारणावर फारशी पकड नसलेल्या कमलनाथ यांना दिग्विजयसिंह हे फायदेशीर वाटू शकतात. ज्योतिरादित्य यांना एकटे पाडण्यातही त्यांची मदत होऊ शकते, असा कमलनाथ यांचा कयास असावा. तसेच काठावर बहुमत असलेले सरकार चालविताना काही दगाफटका झालाच तर संकटाच्या काळात दिग्विजयसिंह हेच मदतीला येऊ शकतात, असे कमलनाथ यांना वाटणे स्वाभाविक आहे. तरी कमलनाथ यांनी 'दिग्गी राजां'ना अनेकदा झटके दिले आहेत, हेही विसरून चालणार नाही. मध्य प्रदेश कॉंग्रेसमधील गटबाजीचा वाद पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दारात पोहोचला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com