महाराष्ट्रातील काॅंग्रेस उमेदवार ठरविणाऱ्या समितीचे ज्योतिरादित्य ड्रायव्हर

jyotiraditya to lead congress screening committee
jyotiraditya to lead congress screening committee

पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे मध्य प्रदेशातील युवक नेते ज्योतिरादित्य शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी या समितीची घोषणा आज केली. 

विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निश्‍चित करताना या समितीकडे सर्वाधिकार राहणार आहेत. या समितीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सरचिटणीस व ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, हरीश चौधरी, मणिक्कम टागोर, कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात तसेच आमदार के.सी. पाडवी यांचा समावेश आहे.

राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेससह इतर समविचारी पक्षांशी आघाडी करण्याबाबत या समितीचे मतदेखील महत्वाचे राहणार आहे. शिंदे हे पक्षाचे नव्या पिढीतील दिग्गज नेते मानले जातात. नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांना दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. जम्मू काश्‍मीरचे 370 कलम रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे शिंदे यांनी स्वागत केले होते. गेल्या काही दिवसांत त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चादेखील सुचरू झाली होती. या पार्श्‍वभूमीवर त्यांची छाननी समितीवर झालेली निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com