jyoti bavankule gets ticket from kamathi | Sarkarnama

चंद्रशेखर बावनकुळेंएेवजी त्यांच्या पत्नीला कामठीतून भाजपची उमेदवारी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी सोपवल्यामुळे, मी कामठी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी दाखल केली असल्याचे ज्योती बावनकुळे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांना सांगितले.

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे विदर्भाची जबाबदारी सोपवल्यामुळे, मी कामठी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी दाखल केली असल्याचे ज्योती बावनकुळे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांना सांगितले.

ज्योती यांनी अर्ज दाखल केल्यामुळे बावनकुळेंच्या उमेदवारीबाबत जे नाट्य काल रात्रीपासून सुरु होते. त्यावर अखेर पडदा पडला. बावनकुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत कामठीकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येत होते. पण ज्योती यांनी अर्ज भरेपर्यंत ते तहसील कार्यालयात पोचले नव्हते. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाने नेमकी काय जबाबदारी सोपविली, हे कळू शकले नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख