फक्त काही दिवस घरी बसा आव्हानांवर मात करू, अजितदादांना विश्वास 

कोरोनाचा प्रसार पाहता हा विषाणू आपल्या गावात, वस्तीत, सोसायटीत पोहचला आहे. त्याला स्वत:च्या घरात न आणणं, स्वत:ला, कुटुंबाला त्याची लागण होऊ न देणं हे आता तुमचं कर्तव्य आहे.
 फक्त काही दिवस घरी बसा आव्हानांवर मात करू, अजितदादांना विश्वास 

मुंबई : कोरोनावर मात आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणं ही दोनच आजच्या घडीला राज्यासमोरची प्रमुख आव्हानं आहेत. नागरिकांनी आणखी काही दिवस घरातच थांबून कोरोनाचा प्रसार रोखला तर या आव्हानांवर लवकरात लवकर मात करु शकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला आवाहन केलं आहे की, राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत साडेसहाशेपर्यंत झालेली वाढ थांबवणं, दररोज वाढणारे मृत्यू रोखणं, आरोग्य, पोलिस, अन्य यंत्रणांवरचा ताण कमी करणं, टाळाबंदीनं ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणणे ही आपल्या सर्वांसमोरची प्रमुख आव्हानं आहेत. या आव्हानांवर लवकरात लवकर मात करण्यासाठी नागरिकांनी संयम व शिस्त पाळली पाहिजे. 

आणखी काही दिवस संयम पाळला आणि घराबाहेर पडणं टाळलं तर, कोरोना आटोक्‍यात येऊ शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. 

राज्यात आरोग्य, पोलिस, अन्न व नागरी पुरवठा व सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी ध्येयनिष्ठेने काम करत असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 

महावीर जयंतीनिमित्ताने शुभेच्छा 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भगवान महावीर जयंतीनिमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांनी अखिल विश्वाला मानवतेच्या कल्याणाचा विचार दिला.

प्राणीमात्रांवर प्रेम, दया करायला शिकवलं. शांतता, अहिंसा, बंधुत्वाच्या माध्यमातून या जगाचं कल्याण होऊ शकतं हा त्यांचा विचार आचरणात आणला पाहिजे, असे उपमुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटलं आहे. 

राज्यावरील कोरोनाचं संकट लक्षात घेऊन यावर्षी नागरिकांनी महावीर जयंतीला घराबाहेर पडू नये, आपापल्या घरातंच पूजा-अर्चा, प्रार्थना करावी, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com