तान्‍हाजी मुटकुळे यांनी राष्ट्रीय महामार्गाची कामे मंजूर करून घेतली  : जे.पी. नड्डा  

Mutkule Nadda
Mutkule Nadda

सेनगाव   ः काँग्रेसच्‍या काळात एकही मुख्यमंत्री एक ते दिड वर्षापेक्षा अधिक काळ मुख्यमंत्री पदावर टिकू शकला नाही. संगीत खुर्ची खेळल्‍याप्रमाणे प्रत्‍येकाने पदावर येवून भ्रष्टाचार केला असा आरोप भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी गुरुवारी (ता.२१) केला आहे.

येथे हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार तान्‍हाजी मुटकुळे यांच्‍या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार तान्‍हाजी मुटकुळे, आमदार रामराव वडकुते, प्रदेश संघटन मंत्री रेणूकादास देशमुख, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आप्‍पासाहेब देशमुख, अभिजित देशमुख, दिवाकर माने, के.के. शिंदे, संदेश देशमुख, दिनकर देशमुख, उद्धवराव गायकवाड, संतोष देवकर आदी उपस्‍थित होते.

यावेळी बोलताना श्री. नड्डा म्‍हणाले की, काँग्रेसने त्‍यांच्‍या काळात भ्रष्टाचार केला. भ्रष्ट नेत्‍यांमुळे राज्‍याचा विकास थांबला. मात्र भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष मुख्यमंत्री पदावर राहून राज्‍याचा विकास केला. त्‍यांच्‍या पाच वर्षाच्‍या काळात राज्‍याचा चेहरा बदलला आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीत दिलेल्‍या पाठबळाच्‍या जोरावर काश्मीरमधील ३७० कलम रद्द केले आहे.

महाराष्ट्रासह देशात सत्तर वर्षात अनेक शेतकरी नेते जन्‍मले. मात्र कोणीही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्‍मान योजना राबवून देशातील शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. उज्‍ज्‍वला योजनेत ग्रामीण भागातून आठ करोड गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले. आयुष्यमान भारत योजनेमधून गरजूंना औषधोपचाराची तरतूद करून दिली. तसेच पाच लाख रुपयांचा विमा दिला आहे. आतापर्यंत चाळीस लाख जनतेला याचा फायदा झाला आहे.

महाराष्ट्रात दारिद्र्य रेषेखालील नसलेल्‍या जनतेलाही या योजनेचा लाभ द्यावा यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाठपुरावा केला. त्‍यामुळे आता पैशाअभावी एकही व्यक्‍ती आरोग्‍य सेवेपासून वंचित राहणार नाही. देशात महाराष्ट्र विविध क्षेत्रात उल्‍लेखनीय कामगिरी करत तिसऱ्या स्‍थानावर आले असून आगामी पाच वर्षात पहिल्‍या स्‍थानावर आणण्यासाठी जनतेने भाजप शिवसेना महायुतीला संधी द्यावी असे आवाहन त्‍यांनी केले. यावेळी त्‍यांनी भाजप उमेदवार तथा आमदार तान्‍हाजी मुटकुळे यांच्‍या कार्याचा गौरव केला. श्री. मुटकुळे यांनी मागील पाच वर्षात सिंचन अनुशेष वेगळा करून दिला. राष्ट्रीय महामार्गाची कामे मंजूर करून घेतली आहेत. त्‍यांच्‍यासारख्या काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन त्‍यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com