भाजपचे हिंदुत्व मनुवादी तर शिवसेनेचे सेक्‍युलरवादी - जोगेंद्र कवाडे

....
 भाजपचे हिंदुत्व मनुवादी तर शिवसेनेचे सेक्‍युलरवादी - जोगेंद्र कवाडे

औरंगाबाद : राज्यात सत्तेबाहेर गेलेल्या भाजपकडून सातत्याने शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका केली जाते. पण भाजप आणि शिवसेनेच्या हिंदुत्वामध्ये खूप फरक असून भाजपचे हिंदुत्व मनुवादी तर शिवसेनेचे हिंदुत्व सेक्‍युलरवादी असल्याचे मत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलतांना कवाडे यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर आपले मत मांडले. प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेवर व त्यांच्या हिंदुत्वावर भाजपकडून सातत्याने होणाऱ्या टिकेला कवाडे यांनी उत्तर दिले. केंद्र सरकारचे धोरण हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली. 

प्रा. कवाडे म्हणाले, फडणवीस सरकारने फक्त घोषणा केल्या; परंतु शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार चांगले काम करत आहे. कर्जमाफीनंतर दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळावी यासाठी चाचपणी सुरू असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल. एनआरसी, सीएए कायदा लागू करून देशात पुन्हा एकदा भेदाचा डाव भाजपने आखला आहे. त्यामुळे देशामध्ये कोंडवाडा बनवला जात आहे. हीच प्रवृत्ती देश विघातक असून जर देश अखंडित ठेवायचा असले तर हिंदू सेक्‍युलर असणे काळाची गरज आहे, असेही प्रा. कवाडे म्हणाले. जेएनयू विद्यापीठाच्या कुलगुरूंना हटवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com