जितेंद्र आव्हाड म्हणतात...अभी नही तो कभी नही!

मुंबईसारख्या शहरात सार्वजनिक वाहतूक बंद असली तरी खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी व्हायला तयार नाही. अशावेळी खरंतर संचारबंदी असायला हवी, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे
Jitendra Awhad Raises Worry about Mumbai Traffic
Jitendra Awhad Raises Worry about Mumbai Traffic

ठाणे : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८९ वर जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत तीन बळी कोरोनाने घेतले आहेत. काल एक दिवसाचा 'जनता कर्फ्यू' झाला. पण लोक पुन्हा मूळपदावर आले आहेत. मुंबईसारख्या शहरात सार्वजनिक वाहतूक बंद असली तरी खासगी वाहनांतून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी व्हायला तयार नाही. अशावेळी खरंतर संचारबंदी असायला हवी, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबईत ठिकठिकाणी गर्दी होत असल्याची वृत्तं माध्यमं दाखवत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चार मोठ्या शहरांमध्ये लाॅकडाऊन जाहीर केलं असलं तरी लोकांनी ते गांभीर्यानं घेतलेलं नाही. त्यातच रशियात लोकांनी बाहेर पडू नये म्हणून तिथल्या सरकारनं रस्त्यावर सिंह सोडल्याचे एक 'फेक' छायाचित्रं सोशल मिडियावरुन फिरत आहे. हे छायाचित्र 'फेक' असलं तरी मुंबईसारख्या शहरात असं काहीतरी हवं की ज्यानं लोक रस्त्यावर फिरणार नाहीत, असं मत डाॅ. आव्हाड यांनी व्यक्त केलं. 

आव्हाड यांनी एक ट्वीटही केलं आहे. 
परिस्थिती गंभीर आहे covid positive ची संख्या ८९ झाली आहे .. लोक गांभीर्याने घेत नाही आहेत मी स्वतः फिरून हा अनूभव घेतला. लोक ऐकत नाहीत 
संचार बंदी हाच एकमेव उपाय आहे 
परिस्थिती चा विचार करता...
अभि नही तो कभी नही...
असं आव्हाड यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com