जितेंद्र आव्हाड आमदार ठाण्याचे; मात्र मंत्री झाल्याने सर्वाधिक आनंद नाशिकला

जितेंद्र आव्हाड सलग तीन वेळा शिवसेना व अल्पसंख्यांक समाजाचे वर्चस्व असलेल्या मुंब्रा- कळवा मतदारसंघातून पाऊणलाखांचे मातधिक्‍य घेऊन विजयी झाले आहेत. ते सध्या ठाण्यात राहतात. मात्र, त्यांचे मुळगाव पास्ते (ता. सिन्नर) आहे. ​
Nashik People Happy as Jitendra Awhad Getting Ministry
Nashik People Happy as Jitendra Awhad Getting Ministry

नाशिक : राज्य मंत्रीमंडळाच्या उद्या (ता.30) होणाऱ्या विस्तारात जितेंद्र आव्हाड यांचा शपथविधी जवळपास निश्‍चित मानला जातो. श्री. आव्हाड मंत्री होणार असल्याने ते ठाण्याचे असले तरीही त्यांचे मुळ गाव पास्ते (सिन्नर) असल्याने ठाण्यापेक्षा अधिक आनंद नाशिककरांना झाला आहे. यानिमित्ताने नाशिककरांना हक्काचा आणखी एक मंत्री मिळणार आहे. त्यामुळे असंख्य कार्यकर्ते आजच त्यांच्या शपथविधीसाठी रवाना झाले आहेत.

जितेंद्र आव्हाड सलग तीन वेळा शिवसेना व अल्पसंख्यांक समाजाचे वर्चस्व असलेल्या मुंब्रा- कळवा मतदारसंघातून पाऊण लाखांचे मातधिक्‍य घेऊन विजयी झाले आहेत. ते सध्या ठाण्यात राहतात. मात्र, त्यांचे मुळगाव पास्ते (ता. सिन्नर) आहे. त्यांचे वडिल मुंबईला स्थायिक झाले. त्यांच्या भगिनी शुभांगी गर्जे यांचे सासर नांदुर शिंगोटे आहे. त्या नाशिक जिल्हा परिषदेच्या सभापती होत्या. श्री. आव्हाड येथीव वंजारी समाजाच्या प्रतिष्ठीत व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सदस्य आहेत. त्यांचे असंख्य भाऊबंद, आप्त नाशिकला आहेत. त्यामुळे आव्हाड मंत्री झाल्यास ठाण्यापेक्षाही अधिक व पक्षविरहीत सर्वच कार्यकर्त्यांना आनंद होणार आहे. 

त्यामुळे असंख्या कार्यकर्ते आज शपथविधीसाठी रवाना झाले. श्री. आव्हाड यांचे समर्थक व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. आम्ही सर्वच त्यांच्या शपथविधीला जाणार आहोत. यानिमित्ताने सिन्नरला हक्काचा मंत्री मिळाला. भुजबळांनतर श्री. आव्हाड हे नाशिकसाठी दुसरे हक्काचे मंत्री असतील असे त्यांनी सांगीतले.

सिन्नर हा दुष्काळी तालुका असल्याने या तालुक्‍यातील जवळपास प्रत्येक गावातील अनेक जन रोजगारासाठी मुंबईत स्थायिक आहेत. विशेषतः सीएसटी रेल्वे स्थानक, मंत्रालय, प्राप्तीकर, पोलिस यांसह विविध विभागांत सिन्नरचे असंख्य नागरीक महत्वाच्या पदांवर कार्यरत असतात. त्यांचा सन्नरच्या नेत्यांना नेहेमीच पाठींबा असतो. त्यादृष्टीने जितेंद्र आव्हाड ठाण्याचे असले तरी नाशिकचे मंत्री म्हणून सगळ्याच नाशिककरांनी मनापासून आनंद व्यक्त केला आहे.

जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे एकनिष्ठ आणि पुरोगामी विचाराची पक्की बैठक असलेले नेते आहेत. नाशिककर म्हणून देखील ते आम्हाला जवळचे आहेत. मात्र व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे ते सदस्य असल्याने आमच्या संस्थेलाच मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले अशी आमची भावना आहे  - कोंडाजी मामा आव्हाड, माजी सरचिटणीस, व्ही. एन. नाईक संस्था.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com