jitendra awhad facebook page news | Sarkarnama

अच्छे दिन सोडा, " अच्छा घंटा"ही नशिबात नाही : आव्हाड 

ब्रह्मा चट्टे 
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई : आज चाळीस महिने होत आले, तरी अच्छे दिन सोडा, एखादा 'अच्छा घंटा'सुद्धा जनतेच्या नशिबात आलेला नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

मुंबई : आज चाळीस महिने होत आले, तरी अच्छे दिन सोडा, एखादा 'अच्छा घंटा'सुद्धा जनतेच्या नशिबात आलेला नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

फेसबूरवर लिहलेल्या पोस्टमध्ये आव्हाडांनी राज्याच्या सध्य परिस्थीतीवरही भाष्य केले आहे. आव्हाड म्हणतात, " बुलेट ट्रेनच्या गोळ्या सोडताना जागोजागी खड्डे पडलेले देशभरातले रस्ते यांना दिसत नाहीत. करोडो रुपये सगळ्या च्यानलवर, पेपरात आणि होर्डिंग्जवर पंतप्रधान झळकवायला फुकतात आणि अंगणवाडी सेविकांना द्यायला पगार नाही. धनदांडग्याना पार ऑस्ट्रेलियापर्यंत कर्ज मिळतं आणि सामान्य माणसाला मात्र 500 रुपये काढले की 15 रुपये चार्जेस लावतात. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती करताना आव्हाड म्हणातात, " मोदीजी, जनतेने तुम्हाला ओंजळी भरभरून मते दिली, तिला तुम्ही 15 लाखांचा जुमला करून फसवलंच. आता वरून सामान्य जनतेच्याच खिशावर डल्ला मारू नका, एव्हढीच विनंती आहे.'' 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख