मी मुर्ख नाही, मी घरातले दिवे बंद करणार नाही : जितेंद्र आव्हाड

येत्या रविवारी (ता. ५) रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातले दिवे बंद करुन मेणबत्ती, तेलाचे दिवे किंवा मोबाईल टाॅर्च लावा, असे आवाहन मोदीं यांनी आज सकाळी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केले. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी कडाडून टिका केली आहे
Jitendra Awhad Mocks PM Narendra Modi Appeal
Jitendra Awhad Mocks PM Narendra Modi Appeal

पुणे : ''मी मुर्ख नाही. मी 'त्या' दिवशी एकही मेणबत्ती पेटवणार नाही. मी माझ्या घरातले दिवे बंद करणार नाही,'' असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री व सोलापूरचे पालकमंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलेल्या आवाहनावर कडाडून टिका केली आहे.

येत्या रविवारी (ता. ५) रात्री नऊ वाजता नऊ मिनिटे घरातले दिवे बंद करुन मेणबत्ती, तेलाचे दिवे किंवा मोबाईल टाॅर्च लावा, असे आवाहन मोदीं यांनी आज सकाळी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून केले. त्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, "देशाला आशा होती की मोदी साहेब जीवनावश्यक वस्तूंबाबत बोलतील. भारतातील कुठलाही नागरिक उपाशी झोपणार नाही, याबद्दल बोलतील. सॅनिटायझर व औषधं, मास्क याची उपलब्धतता मुबलक प्रमाणात असेल व कुणालाही औषधं कमी पडणार नाही, यावर बोलतील. आम्ही एक नवीन लस शोधून काढतोय यावर बोलतील. टेस्टिंग कीट कमी पडणार नाहीत यावर बोलतील. कोरोनामुळे भयग्रस्त झालेल्या जनतेला आधार देतील, असं वाटलं होतं,'' 

प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावासा यांना का वाटतो? असा सवाल करुन ते म्हणाले, ''त्यांनी नवीनच फंडा काढला. म्हणाले अंधार करा आणि लाईट पेटवा. लोकांच्या जीवनात अंधार पसरलेला असताना पंतप्रधानांनी त्यांच्या जीवनात उजेड आणण्याची आवश्यकता आहे. गरज आहे आणि अपेक्षा आहे. अशावेळी ते म्हणतात मोबाईलचे टाॅर्च पेटवा. हा तद्दन मुर्खपणा आहे. नादान बालीशपणा आहे. मी आज जाहीर करु इच्छितो की मी काम करतोय. मी गरीबांमध्ये जातोय. मी गरीबांना जेवण देतोय. ते तेल आणि मेणबत्तीचे पैसेही मी गरीबांना देईन. मी माझ्या घरातले लाईट सुरु ठेवणार व एकही मेणबत्ती पेटवणार नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com